मुकुल वासनिक, सत्यजित तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त देऊळगाव राजात अनाथांना आवश्यक साहित्‍य, वृक्षारोपण

देऊळगाव राजा (राजेश कोल्हे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक व प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त युवक काँग्रेसच्या देऊळगाव राजा तालुका व शहर शाखेतर्फे आज, २७ सप्टेंबरला विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. कोरोनामुळे आई-वडिलांचे छत्र हरवलेल्या बालकांना जीवनोपयोगी साहित्य, शैक्षणिक सहित्य, कपडे तसेच देऊळगाव राजा शहरातील शिवाजी हायस्कूलमध्ये …
 

देऊळगाव राजा (राजेश कोल्हे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक व प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त युवक काँग्रेसच्‍या देऊळगाव राजा तालुका व शहर शाखेतर्फे आज, २७ सप्‍टेंबरला विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.

कोरोनामुळे आई-वडिलांचे छत्र हरवलेल्या बालकांना जीवनोपयोगी साहित्य, शैक्षणिक सहित्य, कपडे तसेच देऊळगाव राजा शहरातील शिवाजी हायस्‍कूलमध्ये वृक्षारोपण करण्यात आले. अंढेरा येथील माता पित्याचे छत्र हरवलेल्या गणेश वैद्य या बालकास शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. ग्रामीण भागात विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य मनोज कायंदे, प्रा. दिलीप सानप, तालुकाध्यक्ष सुभाष दराडे, अतिष कासारे, रमेश कायंदे, हनिफ शाह, गजानन काकड, गजानन बनसोडे, इस्माईल बागवान, गजानन तिडके अादींसह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.