चिखलीत कोविड लस देण्याचा आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांच्या हस्ते शुभारंभ
चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सार्या जगाला भयभीत करून ठप्प करणार्या आणि आतापर्यंत लाखो लोकांचा जीव घेणार्या कोरोनाला हद्दपार करण्यासाठी प्रतिबंधात्मक लसीकरणाचा शुभारंभ चिखली येथे उपजिल्हा रुग्णालयात आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी चिखली येथील आरोग्य कर्मचार्यांना लस देण्यात आली.
कोणतेही औषध, लस नसताना मृत्यू समोर आहे हे माहीत असूनही आरोग्य, पोलीस, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका आणि इतर योध्यांनी न घाबरता कोरोना काळात जीवावर उदार होऊन काम केले. त्यामुळे हे कोरोना योद्ध्येच सर्वसामान्य जनतेसाठी औषधे आणि लस होत्या, असे कौतुकोद्गार आमदार सौ. श्वेताताई महाले यांनी यावेळी काढले. यावेळी नगराध्यक्षा सौ प्रियाताई बोंद्रे, सौ सिंधुताई तायडे (सभापती पंचायत समिती सभापती), डॉ. प्रतापसिंह राजपूत (जिल्हा उपाध्यक्ष भाजप), पंडितदादा देशमुख (शहराध्यक्ष), तालुकाध्यक्ष डॉ. कृष्णकुमार सपकाळ, वैद्यकीय अधीक्षक डॉ. ए. टी. खान, तहसीलदार अजितकुमार येळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. इम्रान खान, पोलीस निरिक्षक श्री. दवणे, जि. प. सदस्या सुनंदाताई शिनगारे , सौ. मनीषाताई सपकाळ (पंचायत समिती सदस्य), शेख अनिस शेख बुढण जिल्हाध्यक्ष अल्पसंख्याक आघाडी रुग्ण कल्याण समिती सदस्य, नामु गुरुदासानी, बबनराव राऊत, नगरसेवक अनुप महाजन, विजय नकवाल, शैलेश बाहेती, गोविंद देव्हडे, सुदर्शन खरात, सुभाष अप्पा झगडे, प्रा. राजू गवई (गटनेते), कुणाल बोंद्रे ,दिलीप सेठ डागा, सिद्धेश्वर ठेंग (तालुका प्रसिद्धीप्रमुख), विजय खरे, सुरेश इंगळे, विक्की शिनगारे, डॉ. चंद्रशेखर धनवे, डॉ. मनीषा बकाल (व्यवस्थापक कोविड सेंटर), अनिल मोरे (जिल्हा आरोग्य पर्यवेक्षक बुलडाणा), आरोग्यसेवक सुशील वाघ, मिलिंद वाघ, सुधाकर जगताप, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्राची तनपुरे, डॉ. आरिफ बेग, डॉ. प्रदीप मेहेत्रे, डॉ. फारुख शेख, डॉ. प्रशांत मेहेत्रे, डॉ. रश्मी पाटील, डॉ. प्रतीक्षा वायाळ, फार्मासिस्ट राहुल वाघमारे, विजय डुकरे, प्रभाकर डुकरे, फार्मासिस्ट अमोल मेहेत्रे, गीता सुरडकर अधिपरिचरिका, सुरेखा म्हस्के अधिपरिचरिका, गणेश पठाडे कनिष्ठ लिपिक, आशा वर्कर व इतर रुग्णालयीन कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान अनिल मोरे व श्रीमती जाधव यांना कोविड लस देण्यात आली.
देऊळगाव राजातही प्रारंभ
देऊळगाव राजा (राजेश कोल्हे) ः देऊळगाव राजा येथेही ग्रामीण रुग्णालयात कोरोना लसीकरणास प्रारंभ करण्यात आला. यावेळी तहसीलदार सरिका भगत, वैद्यकीय अधिकारी डॉ. आस्मा शाहीन, डॉ. राजमाने, डॉ. सतिश मांटे उपस्थित होते. कोरोना लस नोंदणी केलेल्या शंभर कर्मचार्यांना दिली जाणार आहे.