कोरोनाच्या एका रुग्‍णाची भर, दोघांना डिस्‍चार्ज, २८ बाधित घेताहेत उपचार

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 20 ऑगस्टला एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण नव्याने समोर अाला आहे. देऊळगाव राजा तालुक्यातील डोंगर सोयगाव येथील हा रुग्ण असून, दोघांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. सध्या रुग्णालयात 28 रुग्ण उपचार घेत आहेत. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 1030 अहवाल प्राप्त झाले आहेत. पैकी …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 20 ऑगस्‍टला एक कोरोना पॉझिटिव्‍ह रुग्‍ण नव्याने समोर अाला आहे. देऊळगाव राजा तालुक्‍यातील डोंगर सोयगाव येथील हा रुग्‍ण असून, दोघांना रुग्‍णालयातून डिस्‍चार्ज मिळाला आहे. सध्या रुग्‍णालयात 28 रुग्‍ण उपचार घेत आहेत.

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 1030 अहवाल प्राप्त झाले आहेत. पैकी 1029 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, 1 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये रॅपिड अँटिजेन टेस्टमधील एका अहवालाचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 737 तर रॅपिड टेस्टमधील 292 अहवालांचा समावेश आहे. आजपर्यंत 674517 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86664 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे.

आज रोजी 1468 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आजअखेर एकूण 87364 कोरोनाबाधित रुग्ण असून, पैकी 86664 कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यःस्थितीत कोविडचे 28 सक्रीय रुग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 672 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.