उपचाराला पैसे नव्हते पित्याने पोलिसोग्रस्त मुलाचा घोटला गळा

गुजरातमध्ये धक्कादायक घटना ; पिता ताब्यात राजकोट : कधीकधी आर्थिक परिस्थिती माणसाला गुन्हेगार बनविते, असे म्हणतात.गुजरातमध्ये कच्छ जिल्ह्यात मुंद्रा येथे अशाच आर्थिक परिस्थितीने गांजलेल्या एका पित्याने पोलिओग्रस्त मुलाच्या उपचाराचा खर्च सोसवत नसल्याने त्याचा चक्क गळा आवळून खून केल्याची धक्कादायक तितकाच दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी पित्यास ताब्यात घेतले असून त्याची चौकशी केली जात आहे.पोलिसांनी …
 

गुजरातमध्ये धक्कादायक घटना ; पिता ताब्यात

राजकोट : कधीकधी आर्थिक परिस्थिती माणसाला गुन्हेगार बनविते, असे म्हणतात.गुजरातमध्ये कच्छ जिल्ह्यात मुंद्रा येथे अशाच आर्थिक परिस्थितीने गांजलेल्या एका पित्याने पोलिओग्रस्त मुलाच्या उपचाराचा खर्च सोसवत नसल्याने त्याचा चक्क गळा आवळून खून केल्याची धक्कादायक तितकाच दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी पित्यास ताब्यात घेतले असून त्याची चौकशी केली जात आहे.
पोलिसांनी सांगितले की, आरोपीचे नाव हरिश कामी असे असून तो मूळचा नेपाळचा रहिवासी आहे. त्याला एक मुलगा व एक मुलगी आहेत. मुलगा पोलिओने आजारी होता. तर हरिष कामी हा दिवसा खानवळीत आणि रात्री बांधकामावर सुरक्षा रक्षक म्हणून काम करत असे. हरिषने सोमवारी रात्री आपल्या नऊ वर्षीय मुलाची हत्या केली. तो मुलाला मारत असताना त्याची पाच वर्षांची मुलगीही समोरच होती.पण त्याने तिला धमकावत गप्प बसविले.मुलाची हत्या केल्यानंतर त्याचा मृत्यू नैसर्गिकरित्या झाला असे भासवून हरिषने शेजार व मोजक्या नातेवाईकांना सोबत घेऊन मुलाचा दफनविधीही उरकला. परंतु दोन दिवसांनी कामीच्या पाचवर्षीय मुलीने ही हकीकत आईला सांगितली. तिला हे ऐकून धक्काच बसला. तिने तिच्या भावाच्या मदतीने पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पुरलेला मृतदेह बाहेर काढला व त्याचे शवविच्छेदन केले. त्यात मुलाला गळा घोटून मारल्याचे स्पष्ट झाले. नंतर पोलिसांनी हरिष कामीला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता,त्याने मुलाच्या उपचाराचा खर्च सोसवत नव्हता.दोनदोनठिकाणी नोकरी करूनही संसार व्यवस्थित चालत नव्हता. त्यामुळे मुलाची गळा घोटून हत्या केल्याची कबुली दिली.