ASP हेमराजसिंह राजपूत, DYSP रमेश बरकते यांची बदली; श्रवण दत्त, सचिन कदम नवे अधिकारी!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः राज्य शासनाने काल, ९ सप्टेंबर रोजी राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून, यात खामगावचे अप्पर पोलीस अधीक्षक आणि बुलडाण्याच्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची बदली झाली आहे. त्यांच्या जागी दोन नवे अधिकारी बदलून येणार आहेत. अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत (खामगाव) यांची पोलीस उपायुक्त मुंबई शहर येथे बदली करण्यात आली आहे. …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः राज्य शासनाने काल, ९ सप्टेंबर रोजी राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून, यात खामगावचे अप्पर पोलीस अधीक्षक आणि बुलडाण्याच्‍या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची बदली झाली आहे. त्‍यांच्‍या जागी दोन नवे अधिकारी बदलून येणार आहेत. अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत (खामगाव) यांची पोलीस उपायुक्त मुंबई शहर येथे बदली करण्यात आली आहे.

बुलडाणा उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश सुदाम बरकते यांची उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा येथे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. दोन्ही अधिकाऱ्यांची जिल्ह्यातील कारकिर्द चांगल्या कामगिरीमुळे चर्चेत राहिली. परभणी जिल्ह्याचे सहाय्यक पोलीस अधीक्षक म्हणून पद सांभाळणारे श्रवण एस. दत्त हे बुलडाणा जिल्ह्यात श्री. राजपूत यांच्‍या जागी बदलून येणार आहेत, तर श्री. बरकते यांच्या जागी अकोला येथे उपविभागीय अधिकारी म्हणून काम सांभाळलेले सचिन तुकाराम कदम हे बदलून येणार आहेत. सचिन तुकाराम कदम मूळचे सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील उपळाई येथील आहेत. त्यांची बहीण सोनाली यासुद्धा पोलीस उपअधीक्षक म्हणून महाराष्ट्र पोलीस दलात नावलौकिकप्राप्‍त आहेत. श्रवण दत्त हे मूळचे हैदराबादचे आहेत.