350 कोंबड्यांना दयामरण!; सारोळापीर, भोलपुरात प्रशासनाची खबरदारी
बुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मोताळा तालुक्यातील सारोळापीर आणि शेगाव तालुक्यातील भोलपुरा येथील 350 कोंबड्यांना दयामरण देण्यात आले आहे. दोन्ही ठिकाणच्या कोंबड्यांचे बर्ड फ्लू रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली होती. सोराळपीर येथील दयासागर डोंगरे आणि भोलपुरातील शुभम राजगुरे यांच्याकडील कोंबड्यांना बर्ड फ्लू झाल्याचे 7 फेब्रुवारीला समोर आले होते. त्यामुळे या संसर्ग …
Feb 11, 2021, 19:33 IST
बुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मोताळा तालुक्यातील सारोळापीर आणि शेगाव तालुक्यातील भोलपुरा येथील 350 कोंबड्यांना दयामरण देण्यात आले आहे. दोन्ही ठिकाणच्या कोंबड्यांचे बर्ड फ्लू रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली होती. सोराळपीर येथील दयासागर डोंगरे आणि भोलपुरातील शुभम राजगुरे यांच्याकडील कोंबड्यांना बर्ड फ्लू झाल्याचे 7 फेब्रुवारीला समोर आले होते. त्यामुळे या संसर्ग केंद्रापासून 1 कि.मी. परिसर बाधित क्षेत्र तर 2 कि.मी. परिसर निगराणी क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. या बाधित क्षेत्रातील कोंबड्यांची विल्हेवाट लावण्याचे काम जलद कृती दल पार पाडत आहे.