पुण्याच्‍या प्रसिद्ध शेफने बुलडाण्यात टाकलाय केक-पेस्‍ट्रीचा बिझनेस!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः नागपुरातून हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केल्यानंतर पुण्यातील प्रसिद्ध Conrad फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये पाच वर्षे शेफ म्हणून वाहवा मिळवल्यानंतर आपल्या मातीचे काहीतरी देणे लागते या भावनेतून शेफ संदीप पवार यांनी बुलडाण्यात केक आणि पेस्ट्री बिझनेस सुरू केला आहे. श्री. पवार मूळचे आपल्या बुलडाणा तालुक्यातील झरी येथील आहेत. सर्क्यूलर रस्त्यावरील एचडीएफसी स्क्वेअरजवळील नक्षत्र …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः नागपुरातून हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केल्यानंतर पुण्यातील प्रसिद्ध Conrad फाईव्‍ह स्‍टार हॉटेलमध्ये पाच वर्षे शेफ म्‍हणून वाहवा मिळवल्यानंतर आपल्या मातीचे काहीतरी देणे लागते या भावनेतून शेफ संदीप पवार यांनी बुलडाण्यात केक आणि पेस्‍ट्री बिझनेस सुरू केला आहे. श्री. पवार मूळचे आपल्या बुलडाणा तालुक्‍यातील झरी येथील आहेत. सर्क्यूलर रस्‍त्‍यावरील एचडीएफसी स्‍क्‍वेअरजवळील नक्षत्र रेसिडेन्‍सीमध्ये त्‍यांनी “पवार केक्‍स आणि मोर्स’ नावाने बुलडाणेकरांनाही अतिउच्च दर्जाचे केक आणि पेस्‍ट्रीचा अनुभव द्यायला सुरुवात केली आहे.

वडील रामधन पवार यांच्‍या मार्गदर्शनाखाली, पत्‍नी सौ. निकिताताई संदीप पवार आणि भाऊ हरिदास पवार यांच्‍या सहकार्याने संदीप पवार यांनी पाच- सहा महिन्यांपूर्वी बुलडाण्यातील चिंचोले चौकात या व्यवसायाला सुरुवात केली. अल्पावधीत त्‍यांच्‍या सेवा आणि दर्जाचा लौकिक होऊ लागल्याने त्‍यांनी आता सर्क्यूलर एचडीएफसी स्‍क्‍वेअरजवळ आकर्षक, सर्व सुविधांयुक्‍त शॉप सुरू केले. या २६ जुलैला या शॉपचे उद्‌घाटन झाले. अत्‍यंत वाजवी दरात त्‍यांच्‍याकडे उच्‍च दर्जाचे केक्स, पेस्‍ट्री, पिझ्झा, ब्राऊनी, आईसक्रीम, कोल्‍ड कॉफी, होम मेड चॉकलेट, पेढा उपलब्‍ध आहे. याशिवाय सेलिब्रेशन डेकोरेशनही ते स्वस्‍तात ग्राहकांना उपलब्‍ध करून देतात.

हल्दीराम कंपनीचे सर्व प्रोडक्‍टही त्‍यांच्‍याकडे उपलब्‍ध आहेत. मृदू बोलणे, ग्राहकांच्‍या अपेक्षा तातडीने पूर्ण करणे आणि ग्राहकाचे समाधान होईपर्यंत मेहनत घेणे यामुळे श्री. पवार अल्पावधीतच बुलडाण्यात ग्राहकप्रिय झाले आहेत. उच्‍चशिक्षित आणि पुण्यातील फाइव्‍ह स्‍टार हॉटेलमध्ये अनुभव घेतलेले श्री. पवार यांच्‍यामुळे बुलडाणेकरांना “क्‍वालिटी’ची जाणीव खऱ्या अर्थाने होत आहे, असे म्‍हटले तरी अतिशोक्‍ती ठरणार नाही. लवकरच घरपोच सेवा देण्याचा मनोदय असल्याचे त्‍यांनी सांगितले.