सोनल ग्लास ॲन्ड प्लायकडे ग्राहकांची पावले का वळतात... बुलडाणा लाइव्हने जाणून घेतले कारण...!

 
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते... असे म्‍हणतात. बुलडाण्याचे प्रसिद्ध व्यावसायिक प्रितेश इंदरचंद बेदमुथा यांनीही आपल्या यशाचे श्रेय पत्‍नीला दिले आहे. त्‍यांचे बुलडाणा शहरात भगवान महावीर रोडवर नवकार ॲल्युमिनियम व सोनल ग्लास ॲन्ड प्लाय हे भव्यदिव्य प्रतिष्ठान आहे.

नवकार ॲल्युमिनियम ॲन्ड ग्लास हे प्रतिष्ठान श्री. बेदमुथा यांनी ५ जून २००४ रोजी सुरू केले. २००५ साली त्‍यांचा विवाह सोनलताई यांच्याशी झाला. त्यांची श्री. बेदमुथा यांना मोठी साथ लाभली. दोघांनी मिळून सोनल ग्लास ॲन्ड प्लाय हे दालन २०१७ मध्ये सुरू केले. दोघेही उच्चशिक्षित आहेत. पदवीपर्यंत शिकलेल्या प्रितेश बेदमुथा यांनी कॉम्प्युटर हार्डवेअर नेटवर्किंगचा कोर्स केलेला असून, मिळालेला पहिला पगार साडेतीन हजार रुपये होता. तो त्‍यांनी आजोबांना दिला होता.

सौ. सोनलताई एम.कॉम. आहेत. त्‍यांच्याकडे फर्निचर, पार्टिशनसाठी लागणारे सर्व साहित्य मिळते. सर्वप्रकारचे ग्‍लासही त्‍यांच्याकडे उपलब्ध आहेत. माजी सैनिक, सैनिक, डॉक्टरांना ते खरेदीवर १० टक्के सूट देतात. श्री. बेदमुथा यांचा नोकरीऐवजी व्यावसायिक होण्याकडे ओढा होता. व्यवसायात आजोबा हिरालाल बेदमुथा प्रेरणास्‍थान असल्याचे त्‍यांनी सांगितले.

काका डॉ. राजेंद्र बेदमुथा, इंजिनिअर अजय बेदमुथा, आई सौ. कमलाबाई बेदमुथा व वडील इंदरचंद बेदमुथा, पत्नी सौ. सोनल बेदमुथा, मित्र कुमार छाजेड, संतोष मालू, डॉ. मिहीर जैन, विनोद जवरे, तुषार कपाटे यांची मोलाची साथ लाभली, असे ते म्‍हणाले. कोरोना काळात श्री. बेदमुथा यांनी सामाजिक भानही जपले. स्वतः कोरोनाविषयक सर्व नियम तर पाळलेच पण कर्तव्यावर असलेल्या पोलीस बांधवांसाठी पाणी वाटपाचे काम त्‍यांनी केले. कामावर नसतानाही कामगारांना वेतन दिले. डॉ. नितेश छाजेड यांच्याकडे काही रुग्ण पाठवले. त्यांचीसुध्दा मदतीत साथ लाभली, असे ते म्‍हणाले. ग्राहकांना योग्य आणि दर्जेदार वस्तू देणे याकडे कटाक्ष असतो. यापुढेही प्रामाणिकपणे जास्तीत जास्त अत्‍याधुनिक वस्तू देण्याचा प्रयत्‍न असेल, असे ते म्‍हणाले.

संघर्षाची ती आठवण...
२००६ मध्ये माझे गोडावून फोडून चोरट्यांनी ॲल्युमिनियमचा माल चोरून नेला होता. जवळपास ११ लाख रुपयांचा माल चोरीला गेला होता. ते नुकसान भरून काढण्यात ८ ते ९ वर्षे गेले. पण मी हार मानली नाही. एकदा दुकान सुरू होण्याच्या वेळेस माझे पहिले ग्राहक हे देवाच्या मंदिराच्या कामासाठी लागणाऱ्या खिडक्या दरवाजांसाठी आले होते. शेलापूर (ता. मलकापूर) येथे महादेवाच्या मंदिराचे काम सुरू होते. त्‍यावेळेस मी काही न कमावता देवाच्या कामात योगदान दिले, असेही त्‍यांनी अभिमानाने सांगितले.