'बालाजी'चे प्रवीण सावळेंनी दिला कार सुस्थितीत ठेवण्याचा कानमंत्र!

 
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः वाहनाचे व्हील अलायन्मेंट करणे गरजेचे असून, यात मशिनव्दारे गाडीचे टायर व्यवस्थित केले जाते. ते एका लाईनमध्ये आणले जाते. त्‍यामुळे टायर खराब होत नाहीत. दर पाच हजार किलोमीटरनंतर अलायन्मेंट करणे गरजेचे आहे. तुम्ही ते केले नाही तर टायर खराब होणे, गाडी एका बाजूला ओढली जाते. यामुळे अपघातांचे प्रमाण वाढते. व्हील बॅलन्सिंग करून घेतल्यामुळे टायरचे व्हायब्रेशन होत नाही आणि गाडी सॉफ्‍ट चालते. या गोष्टी केल्या नाही तर बेरिंग खराब होणे, एक्सल खराब  होणे, गाडी व्हायब्रेट होणे आदी अडचणी येतात आणि गाडी चालविणे अवघड जाते, अशी महत्त्वपूर्ण माहिती बालाजी कार सर्व्हिसेस ॲन्ड अलायन्मेंट, वॉशिंग सेंटरचे संचालक प्रवीण बबनराव सावळे यांनी बुलडाणा लाइव्हला दिली.

मूळचे चिखली तालुक्यातील डोंगरशेवलीचे रहिवासी व सध्या बुलडाण्यात राहत असलेले श्री. सावळे यांचे ऑटोमोबाइल इंजिनिअरिंग झालेले आहेत. नोकरीच्या मागे न लागता त्‍यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला. बुलडाणा शहरातील चिखली रोडवर येळगाव एमआयडीसीजवळ त्‍यांचे सुसज्‍ज बालाजी कार सर्व्हिसेस अॅन्ड अलायन्मेंट, वॉशिंग सेंटर आहे. बुलडाणा लाइव्हशी बोलताना ते म्‍हणाले, की त्‍यांचे वडील बबनराव भास्कर सावळे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात विस्तार अधिकारी होते. त्‍यांच्याकडे २२ एकर शेतीसुध्दा आहे. ही शेतीसुद्धा प्रवीण सावळे हेच बघतात, हे विशेष.

ऑटोमोबाइल इंजिनिअरिंग केल्यानंतर त्यांनी सुरुवातीला दोन वर्षे औरंगाबाद येथे सानिया मोटर्समध्ये जॉब केला. त्यानंतर त्यांनी जळगाव खानदेशमध्ये एका खासगी गॅरेजमध्येही एक वर्षे जॉब केला. तीन वर्षांच्या अनुभवानंतर त्‍यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. युनियन बँकेच्या सहकार्याने काहीच दिवसांत व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली. १ नोव्हेंबर २०१८ रोजी बालाजी कार सर्व्हिसेस ॲन्ड अलायन्मेंट वॉशिंग सेंटर त्‍यांनी सुरू केले.

अपोलो, योकोहामा टायर कंपन्यांची एजन्सी त्‍यांच्याकडे आहे. गाडीचे वॉशिंग तसेच इंटर्नल क्लिनिंगही केले जाते.  त्‍यांना सरकारी नोकरी करण्याची इच्छा अगोदरपासून नव्हती. स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करायचे होते. त्‍यांचे आयुष्यातील प्रेरणास्थान आई-वडील आहे. त्यांच्या आशीर्वादाने यश मिळवत असून, पत्नीची सुध्दा खंबीर साथ लाभत असल्याचे त्‍यांनी सांगितले. सध्या त्‍यांच्याकडे सात कामगार आहेत. विश्वासाने, चांगल्या दर्जाचे काम करून ग्राहकांचा विश्वास आम्ही कमावला असून, त्‍यामुळेच ग्राहकांचा ओढा आमच्याकडे आहे, असे ते म्‍हणाले. प्रामाणिकपणा, जिद्द आणि चिकाटी हेच यशाचे गमक असल्याचे त्‍यांनी सांगितले.


नायट्रोजन हवेचे फायदे...
नायट्रोजनचा प्रेशर टायरमध्ये स्थिर राहतो. त्‍यामुळे टायर फुटून अपघात होण्याचे प्रमाण कमी होते. संपूर्ण जगात इंधनाची किंमत वाढल्यामुळे टायरमध्ये नायट्रोजन वापरणे आवश्यक झाले आहे. नायट्रोजन गॅस थंड असतो. त्यामुळे टायर हलका चालतो. इंधनाचा खर्च कमी लागतो. नायट्रोजन ड्राय गॅस असल्यामुळे टायरचे लाईफ वाढते. नायट्रोजन गॅस टायरमधून लवकर कमी  होत नाही. त्यामुळे टायरमधील हवेचे प्रेशर वारंवार चेक करण्याची गरज पडत नाही. टायरच्या दोन्ही साईडच्या घिसाईचे प्रमाण कमी होते. नायट्रोजन वापरल्यामुळे रिमोल्डिंगसाठी लागणारा केसिंग चांगला राहतो. नायट्रोजन गॅसमुळे डिक्सला गंज लागत नाही. नायट्रोजन गॅसमुळे टायर गरम होत नाही.