'आयडिअल'चा पार्थ शिष्यवृत्ती परीक्षेत राज्‍यात पाचवा; जिल्हा गुणवत्ता यादीत पाच विद्यार्थी

 
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः महाराष्ट्र राज्‍य परीक्षा परिषद पुणे यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेची गुणवत्ता यादी नुकतीच घोषित करण्यात आली असून, यात बुलडाणा शहरातील प्रसिद्ध आयडिअल क्लासेसचा विद्यार्थी पार्थ संदीप तायडे राज्‍यातील पाचवा आला आहे. जिल्हा गुणवत्ता यादीत अनुष्का चौधरी, प्राची चव्हाण, ओम करवंदे, जय इंगळे, दर्शन कोलते या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
शिकवण्याची पद्धती आणि एकूणच विद्यार्थ्यांवर आयडिअल क्‍लासेसचे शिक्षकवृंद घेत असलेली मेहनत यामुळे या क्‍लासेसचे नाव शहर आणि परिसरात चर्चेला आले आहे. प्रत्‍येक विद्यार्थी अधिकाधिक गुणवान म्‍हणून समोर यावा, यासाठी आम्‍ही कायम प्रयत्‍नरत असतो, असे क्‍लासेसच्या संचालकांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी यशाचे श्रेय प्रेरणा देणारे आई-वडील, मार्गदर्शन करणारे आयडिअल क्‍लासेसचे मार्गदर्शक शिक्षक श्री. वाघ, श्री. दंदाले यांना दिले आहे. कोरोना काळात ऑनलाइन शिकवणी असूनसुद्धा आयडिअल क्‍लासेसने गुणवत्ता कायम ठेवली हे विशेष.