बुलढाण्यात ‘PAHEL Junior’ फाउंडेशन कोर्सला १५ एप्रिलपासून सुरुवात; स्पर्धा परीक्षांसाठी मजबूत पाया घडवण्यावर भर! NEET,JEE ची तयारी होणार भक्कम... वर्ग८,९,१० साठी सुवर्णसंधी....

 
 बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : विद्यार्थ्यांनी लहान वयातच शैक्षणिक संकल्पना भक्कम केल्यास भविष्यातील स्पर्धा परीक्षांची तयारी अधिक सोपी होते, या उद्देशाने बुलढाण्यात ‘PAHEL Institute’तर्फे ‘PAHEL Junior – Foundation Course’ सुरू करण्यात येत आहे. इयत्ता ८वी, ९वी आणि १०वीच्या विद्यार्थ्यांसाठी हा कोर्स असून, नवीन बॅचेसना १५ एप्रिल २०२६ पासून सुरुवात होणार आहे.

या कोर्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना NEET, JEE आणि MHT-CET सारख्या स्पर्धा परीक्षांसाठी लवकर व योग्य दिशा मिळणार असल्याचा दावा संस्थेकडून करण्यात आला आहे. IITian तज्ज्ञ तसेच अनुभवी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना शिकवले जाणार असून, संकल्पना स्पष्ट करण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.
कोर्समध्ये दररोज सायंकाळी वर्ग, स्मार्ट डिजिटल पद्धतीने अध्यापन, नियमित सराव, वैयक्तिक मार्गदर्शन तसेच शंकानिरसन सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवून त्यांना स्पर्धा परीक्षांसाठी सक्षम बनवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे संस्थेकडून सांगण्यात आले. चैतन्यवाडी, बुलढाणा येथे असलेल्या PAHEL Instituteमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून, इच्छुक विद्यार्थ्यांनी लवकर नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ९७६३००९१५६ किंवा ९७६६९२४९०० या क्रमांकांवर संपर्क साधता येईल.