'क्रिषामी'चे प्रोडक्‍ट शेतकऱ्यांसाठी ठरताहेत वरदान!

 
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः केवळ विदर्भच नव्‍हे तर संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरही krishami ॲग्रो प्रोड्यूसर कंपनीच्या प्रोडक्‍टचा अप्रतिम रिझल्ट तुरीसह इतर पिकांवर शेतकऱ्यांना दिसून येत आहे.

२०१८ मध्ये शेतकरी नेते प्रकाश साबळे, शेतकरी ज्ञानेश्वर काळे यांच्यासह इतर शेतकऱ्यांनी मिळून या कंपनीची स्थापना केली. २२ एप्रिल २०२१ ला या कंपनीचे प्रोडक्ट मार्केटमध्ये लॉन्च झाले. अगदी कमी दिवसांत या कंपनीच्या प्रोडक्टचा रिझल्ट हळूहळू शेतकऱ्यांना येऊ लागला अाहे. आज शेतकरी या कंपनीच्या उत्पादनाचा अनुभव व रिजल्ट घेत आहेत. बुलडाणा जिल्ह्यात सर्वप्रथम बुलडाणा तालुक्यातील पांगरी, नांद्राकोळी या गावांसह तालुक्यातील शेतकरी या कंपनीच्या प्रॉडक्टचा वापर करून तुरीवर इतर भाजीपाला उत्पादनावर अप्रतिम रिझल्ट घेत आहेत. शेगाव तालुक्यात मनसगाव, पहूर, पूर्णा, संग्रामपूर तालुक्यातील बोडखा, जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ, कुरण गाळ येथील शेतकऱ्यांनी रिजल्ट घेतले आहेत.

शेतकरी म्‍हणतात...

किशोर जामणेकर यांच्या संपर्कात येऊन सोयाबीन या पिकावर या कंपनीच्या प्रॉडक्टचा मला अनुभव आला. त्यानंतर मी माझ्या गावातील शेतकऱ्यांना याबद्दल माहिती दिली. त्यानंतर तुरीवर आमच्या गावातील बऱ्याच शेतकऱ्यांनी या कंपनीच्या प्रॉडक्ट अप्रतिम रिझल्ट घेतला आहे.
- संदीप उंबर्डे,रा. पांगरी, ता. बुलडाणा

दोन महिन्यांपूर्वी माझी कपाशी खूपच लहान होती. इतरांच्या कपाशीच्या तुलनेत यावर्षी कपाशी होणार की नाही याची सुद्धा गॅरंटी नव्हती. परंतु krishami कंपनीचे स्टार्ट अप, न्यूट्री ग्रोथ, नीम ऑईल, anti फंगस व कॅलिबर तसेच नेचर किंग या औषधाचा फवारा केला. आज दोन महिन्यांनंतर अप्रतिम रिझल्ट मला या फवारणीमुळे मिळाला आहे. इतर औषधांच्या तुलनेत खर्च कमी येतो व रिझल्टही मिळतो.
- नारायण उमाळे, पहूरपूर्णा, ता. शेगाव