डॉक्टर , इंजिनिअर व्हायचं ध्येय आहे ना! मग बुलढाण्यात ‘Career Point Kota’ने उपलब्ध करून दिली आहे संधी; NEET-JEE साठी दर्जेदार मार्गदर्शन, मर्यादित जागा शिल्लक..प्रवेश सुरू..
Apr 10, 2026, 10:45 IST
बुलढाणा (प्रतिनिधी) : बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा): मोठ्या शहरांमध्ये जाऊन शिक्षण घेणे प्रत्येक विद्यार्थ्याला शक्य नसते. विशेषतः ग्रामीण व मध्यमवर्गीय कुटुंबांतील विद्यार्थ्यांसाठी ही मोठी अडचण ठरते. या पार्श्वभूमीवर बुलढाणा शहरात सुरू करण्यात आलेली ‘Career Point Kota’ची शाखा विद्यार्थ्यांसाठी मोठा आधार ठरत असून, NEET, JEE, MHT-CET यांसारख्या स्पर्धा परीक्षांची गुणवत्तापूर्ण तयारी आता स्थानिक पातळीवरच उपलब्ध होत आहे.
शहरासारख्या ग्रामीण भागातही उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे, या उद्देशाने श्री पवार सरांनी ही शाखा सुरू केली आहे. संस्थेत IIT-JEE व NEET परीक्षांचा सखोल अनुभव असलेले प्राध्यापक कार्यरत असून, विद्यार्थ्यांना संकल्पनाधारित शिक्षणावर विशेष भर दिला जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांची मूलभूत तयारी भक्कम होत असल्याचे दिसून येते.
‘Career Point Kota’ बुलढाणा शाखेने आतापर्यंत अनेक डॉक्टर व अभियंते घडवले असून, संस्थेचा निकालही समाधानकारक राहिला आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी नियमित वर्ग, टेस्ट सिरीज, शंकानिरसन सत्र, तसेच वैयक्तिक मार्गदर्शन (Personal Mentorship) यांसारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अनुभवी कोटा फॅकल्टीमार्फत अध्यापन, आधुनिक पद्धतीचे शिक्षण व अभ्यासासाठी अनुकूल वातावरण यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढत आहे.
दरम्यान, शैक्षणिक वर्ष २०२६–२७ साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून, २३ मार्चपासून नवीन बॅचेसना सुरुवात झाली आहे. IIT-JEE, NEET, MHT-CET तसेच फाउंडेशन कोर्ससाठी प्रवेश सुरू असून, मर्यादित जागांमुळे विद्यार्थ्यांनी लवकर नोंदणी करावी, असे आवाहन संस्थेकडून करण्यात आले आहे.
संत गजानन महाराज मंदिर रोड, गंगा पार्किंगजवळ असलेल्या या संस्थेत सर्व आवश्यक शैक्षणिक सुविधा उपलब्ध असून, ‘योग्य मार्गदर्शन, योग्य वेळ आणि योग्य निकाल’ या तत्त्वावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जात आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठ्या शहरांमध्ये न जाता दर्जेदार शिक्षण मिळावे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे संस्थेकडून सांगण्यात आले.अधिक माहितीसाठी ९६०४०९२३२७ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.