दिपक एजन्सीज... टाकसाळ बंधू चालवताहेत प्रामाणिकपणाचा वारसा!

 
बुलडाणा (वाणिज्य प्रतिनिधी मो. ९८५०८७७८९६ ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यातीलच नव्‍हे तर बाहेर जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांचा विश्वास बुलडाण्यातील "दिपक एजन्सीज्‌'वर आहे. वडील, आजोबांकडून शिकलेला प्रामाणिकपणाचा वारसा टाकसाळ बंधू चालवत आहेत. शेतीसाठी लागणारे प्रत्येक साहित्य त्‍यांच्‍याकडे वाजवी दरात उपलब्‍ध आहे. दिपक काशिनाथ टाकसाळ आणि त्‍यांचे लहान बंधू प्रदीप हे एकाचवेळी धाड आणि बुलडाण्यातून शेतकऱ्यांच्‍या सेवेत आहेत.
 

बुलडाण्यातील चिखली रोडवरील गोलांडे लॉन्सच्या बाजूला दिपक एजन्सीज्‌चे भव्य दालन आहे, तर धाडमध्ये औरंगाबाद रोडवर त्‍यांचा व्यवसाय आहे. धाडमध्ये गेल्या १४ वर्षांपासून ते शेतकऱ्यांच्‍या सेवेत आहेत. ते racold, जैन कंपनीचे जिल्ह्यातचे डिस्‍ट्रीब्‍युटर आहेत. racold चे वॉटर हिटर, गिझर होलसेल दरात फक्‍त इथेच मिळतात. याशिवाय शेतीविषयक सर्व साहित्य यात ठिबक, स्‍प्रिंकलर, सर्व प्रकारच्‍या बोअरच्या मोटर, विहीर-धरणातील मोटर, सोलार वॉटर हिटर, गॅस व इलेक्‍ट्रिक गिझर, लॉन्स साहित्य, हार्डवेअरचे सर्व साहित्य दीपक एजन्सीज्‌मध्ये मिळते. त्‍यांची कपाऊंड जाळीची फॅक्‍टरी असल्याने रेडी अँगल, जाळी अत्‍यंत कमी किंमतीत शेतकऱ्यांना मिळते. सध्या सुड्या जाळण्याचे सत्र सुरू आहे. याशिवाय शेती संरक्षित करण्याकडे शेतकऱ्यांचा मोठा कल आहे. यासाठी कंपाऊंड गरजेचे असते. त्‍यामुळे जिल्हा आणि जिल्ह्याबाहेरूनही शेतकरी मोठ्या संख्येने या ठिकाणी येतात.

पिढीजात व्यवसाय...
टाकसाळ बंधूंचा फॅब्रिकेशनचा पिढीजात व्यवसाय आहे. काका संतोष पंढरी टाकसाळ यांच्‍यामुळे त्‍यांना दीपक एजन्सीज्‌ची स्थापना करण्याची प्रेरणा मिळाली. काका जळगाव येथे जैन इरिगेशनमध्ये मॅनेजर होते. त्‍यांनी चांगले मार्गदर्शन केले. यामुळे ही यशस्वी भरारी घेता आल्याचे दिपक टाकसाळ यांनी बुलडाणा लाइव्हला सांगितले. वडील, आजोबांचा भर व्यवसायातील नफ्‍यापेक्षा प्रामाणिकपणाकडे होता. तोच वारसा आम्ही चालवत आहोत. आजवर कोणताही शेतकरी आमच्याकडून नाराज होऊन गेला नाही हीच आमच्या कामगिरीची पावती आहे, असेही श्री. टाकसाळ म्‍हणाले.