फक्त २० हजार रुपये खर्चून सुरू करा "हा" बिझनेस अन् करा ४ लाखांची कमाई! PM नरेंद्र मोदींनीही दिली आयडिया..!

 
बुलडाणा( विशेष प्रतिनिधी: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सातत्याने लोकसंख्या वाढ होत असल्याने बेरोजगारीची समस्या देशाला भेडसावत आहे. बेरोजगारी पासून सुटका मिळवण्यासाठी सरकार स्किल डेव्हलपमेंट वर जोर देत आहे. व्यवसाय सुरू करण्यासाठी, व्यवसाय वाढवण्यासाठी सुद्धा शासनाकडून तरुणांना प्रोत्साहन देण्यात येते. शेतीला जोडधंदा करण्यासाठी सुद्धा शासनाकडून प्रोत्साहन देण्यात येते. दरम्यान शेतीला पूरक अश्या व्यवसायातून सुद्धा बक्कळ कमाई करता येऊ शकते.  विशेष म्हणजे स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी" मन की बात" या कार्यक्रमाच्या ६७ व्या भागात एका बिझनेस वर भाष्य केले होते. केवळ २० हजार रुपयांची गुंतवणूक करून ४ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न देणाऱ्या लेमन ग्रास शेती विषयी मोदींनी भाष्य केले होते.

आपल्याला जर लेमन ग्रास ची शेती करायची असेल तर केवळ १५ ते २० हजार रुपयांची गुंतवणूक करून ती करता येऊ शकते. बाजारात लेमन ग्रास ला मोठी मागणी आहे. सौंदर्य प्रसाधने, औषधे, अत्तर, साबण , तेल यामध्ये लेमन ग्रासचा उपयोग केला जातो. लेमन ग्रास ही गवतासारखी दिसणारी औषधी वनस्पती आहे. लेमन ग्रास मध्ये महत्वाचे औषधीय गुणधर्म आहेत.

विशेष म्हणजे दुष्काळ ग्रस्त भागात सुद्धा लेमन ग्रास ची लागवड करून वर्षाला एकरी ४ लाख रुपयांपर्यंत चे उत्पन्न १५ ते २० हजार रुपयांच्या खर्चात मिळवता येऊ शकते. फेब्रुवारी ते जुलै हा लेमन ग्रास च्या लागवडीचा चांगला काळ आहे. एकदा लागवड झाल्यानंतर वर्षांतून ४ ते ५ वेळा या पिकाची कापणी आपण करू शकतो.

एका एकरातून वर्षभरात ५ टन ओल्या लेमन ग्रास च्या पानांचे उत्पादन होते. आजच्या बाजारभावानुसार त्यातून ४ लाख रुपयांचे उत्पन्न मिळते.