बुलडाणेकर त्‍यांची सुरक्षा विश्वासाने सोपवताहेत "रामहृदय'च्या हाती!

 
बुलडाणा (विपणन प्रतिनिधी, मो. ९८२२९८८८२०) : आजघडीला वाईट घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. गुन्हेगारी वृत्तीचे लोक वाढल्यामुळे प्रत्‍येकात असुरक्षितता वाढीस लागली आहे. त्‍यामुळे सुरक्षा उपकरणे खरेदी करण्याकडे कलही वाढला आहे. मात्र ही साधने खरेदी करतानाही विश्वास कुठे ठेवावा, हा प्रश्न निर्माण होतोच. रामहृदय एंटरप्रायजेसमुळे हा प्रश्न बुलडाण्यापुरता तरी सुटला आहे. जिल्हावासियांना एकाच छताखाली सीसीटीव्ही, वायरलेस अलार्म सिक्युरिटी सिस्टीमसह सर्व प्रकारची सुरक्षा साधने अगदी विश्वासाने उपलब्ध होतात आणि विक्रीपश्चात सेवाही!

 

नोट काऊंटींग व फेक नोट डिटेक्शन मशीन, इंटरकॉम फोन सिस्टिम, स्पिकर अनाऊन्समेंट सिस्टिम व कॅरोओके, सर्व प्रकारचे एलईडी लाईट्‌स, टी-कॉफी व्हेंडिंग मशीन, सर्व प्रकारचे चहा पावडर व प्रीमिक्स टेस्‍टही रामहृदय एंटरप्रायजेसमध्ये विक्रीस उपलब्ध आहे. ग्राहकांचा विश्वास आजवर कसा टिकला अन्‌ वाढतोय कसा, याबद्दल कुतूहल असल्याने बुलडाणा लाइव्हने या दालनाचे संचालक राहुल साहेबराव राऊत यांची भेट घेतली आणि यशाचे रहस्यही जाणून घेतले. एमबीए होऊनही श्री. राऊत यांनी नोकरीत दीर्घकाळ न रमता व्यवसायाची कास धरली.

आजघडीला बुलडाणा शहरातील चिखली रोडवर मुंगळे कॉम्प्लेक्समध्ये त्‍यांचे भव्य दालन आहे. राहुल राऊत यांचा जन्म बुलडाण्यात २२ एप्रिल १९८३ रोजी झाला. वडील शासकीय सेवेत असल्याने त्यांच्या बदल्या होत गेल्या. परिणामी राहुल राऊत यांचे शिक्षण वेगवेगळ्या शहरांत झाले. पुण्यात त्‍यांनी एमबीएचे शिक्षण घेतले. नंतर पुण्यात काही वर्षे त्‍यांनी नोकरी केली. मात्र नोकरीत त्‍यांचे मन रमले नाही. काहीतरी वेगळे करून दाखविण्याची जिद्द त्‍यांच्या मनात होती. आपल्या जिल्ह्यासाठी काहीतरी करायचे हे त्‍यांच्या मनातच होते. त्‍यातूनच त्‍यांनी स्वप्नाला गवसणी घालण्याचा निर्णय घेतला.

जिद्द, चिकाटीने कामाला लागले अन्‌ एप्रिल २०१२ मध्ये व्यवसायाला सुरुवातही केली. भगवती कॉम्प्लेक्स शंकर बुक डेपोजवळ भाड्याने दुकान घेतले. सुरुवातीला बऱ्याच अडचणी आल्या. पण न डगमगता ते पुढे जात राहिले. त्या ठिकाणी ९ वर्षे त्‍यांनी व्यवसाय केला. नंतर ६ एप्रिल २०१९ रोजी मुंगळे कॉम्प्लेक्समध्ये डॉ. गोडे स्टॉपजवळ चिखली रोडवर त्‍यांनी स्वत:चे दुकान विकत घेतले. सिक्युरिटी क्षेत्रातील त्‍यांना १२ वर्षांचा अनुभव आहे. त्‍यामुळेच उत्कृष्ट सेवेसाठी ते ओळखले जातात. ग्राहकांना कुठलीच अडचण येणार नाही याची दक्षता ते घेतात. अनेक हॉस्पिटल्स, नॅशनलाईज बँका, पतसंस्था, शाळा, पेट्रोलपंप, हॉटेल्स, बंग्लो या ठिकाणी शहरातच नव्हे तर पूर्ण जिल्ह्यात त्‍यांची सेवा घेतली जात आहे. ग्राहक विश्वास ठेवून येतात. त्‍यांच्या विश्वासाला तडा जाणार नाही, यासाठी कटिबद्ध असल्याचे श्री. राऊत म्‍हणाले.

काळानुसार अपडेट...
राहुल राऊत हे काळानुसार स्वत:ला अपडेट ठेवत गेले. दिल्ली, मुंबई, पुणे, बंगळुरू या ठिकाणी ते नियमित भेटी देतात, वेगवेगळ्या बैठका, संमेलनात सहभागी होतात. यामुळे जिल्ह्यासाठी अधिकाधिक चांगले उत्‍पादन आणि सेवा देता येते, असे ते म्‍हणतात. डिजिटल युग असल्यामुळे अनेक नव्या गोष्टी मार्केटमध्ये येतात, असे ते म्‍हणाले. आई- वडिलांच्या आशीर्वादानेच व्यवसायात यशस्वी प्रवास करू शकलो, असे ते आवर्जुन सांगतात. डॉ. शोन चिंचोले, डॉ. विकास बाहेकर, डॉ. योगेश शेवाळे यांनीसुध्दा वेळोवेळी मार्गदर्शन केले. पत्नी सौ. सोनाली राऊत यांचाही खंबीर पाठिंबा त्‍यांना लाभला. घरातील सर्व जबाबदारी पत्नीने पार पाडली. आई- वडिलांची सेवा, मुलांचे शिक्षण... त्यामुळे मी घराचा विचार बाजूला ठेवून बाहेर पडलो व व्यवसायात पुढे गेलो, असे राहुल राऊत आवर्जुन सांगतात.

मनात जिद्द हवी...
मनात जिद्द असेल तर काहीच अशक्य नाही. शिक्षण पूर्ण करून अनुभव घ्या, कुठल्याही कामाची लाज न बाळगता व्यवसायात या. चिकाटीने काम करा. तुम्हाला तुमचे यश नक्की मिळणार, असे श्री. राऊत नवोदित व्यावसायिकांना सांगतात. कुटुंबाबद्दल ते म्‍हणाले, की घरात आई-वडील आहेत.वडील सेवानिवृत्त झाले आहेत. दहीद बुद्रूक येथे शेती आहे. मी व मला एक बहीण आहे. बहिणीचे लग्न झाले आहे. मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. पत्नी हाऊसवाईफ आहे. असे आमचे सामान्य कुटुंब आहे, असे ते म्‍हणाले.