शिक्षक-क्‍लर्क दाम्‍पत्‍य, कधी शेगाव, कधी जळगाव जामोदमध्ये राहायचे… काल परतले अन्‌ समोरील दृश्य पाहून हादरले!

शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शिक्षकाचे घर फोडून चोरट्यांनी दागदागिन्यांसह सव्वा लाख रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. ही घटना शेगाव शहरातील गणपतीनगरात काल, २३ ऑगस्टला दुपारी समोर आली. चोरी झाली तेव्हा शिक्षक पत्नीसह जळगाव जामोदला गेले होते. शेगाव शहर पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सोनल विनायकराव पवार (३४) हे संग्रामपूर तालुक्यातील पिंप्री काथरगाव शाळेत …
 

शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शिक्षकाचे घर फोडून चोरट्यांनी दागदागिन्यांसह सव्वा लाख रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. ही घटना शेगाव शहरातील गणपतीनगरात काल, २३ ऑगस्‍टला दुपारी समोर आली. चोरी झाली तेव्‍हा शिक्षक पत्‍नीसह जळगाव जामोदला गेले होते. शेगाव शहर पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे.

सोनल विनायकराव पवार (३४) हे संग्रामपूर तालुक्‍यातील पिंप्री काथरगाव शाळेत शिक्षक आहेत. शेगावच्‍या गणपतीनगरात ते एक वर्षापासून राहतात. त्‍यांची पत्नी सौ. शुभांगी जळगाव जामाेद पंचायत समितीत क्लार्क आहेत. दोघे आठवड्यातून दोन दिवस शेगाव येथील गणपतीनगरात आणि तीन- चार दिवस जळगाव जामोदच्‍या प्रकाशनगरात राहतात. २१ ऑगस्‍टला सकाळी नऊला ते पत्‍नी व मुलाबाळांसह शेगाव येथे सुटी असल्याने राहण्यास आले होते. २२ ऑगस्‍टला रात्री आठला जळगाव जामोदला निघून गेले.

काल, २३ ऑगस्‍टला दुपारी पावणेदोनला जळगाव जामोद येथून शेगावला आले असता घराचे समोरील दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले. घरातील सामान, कपडे अस्ताव्‍यस्‍त दिसले. लोखंडी आलमारी उघडी दिसली. आलामारीतून चांदीची लक्ष्मीची मूर्ती वजन ३०० ग्रॅम (किंमत २२ हजार), सोन्याची गणपतीची मूर्ती वजन ५ ग्रँम (किंमत २० हजार), सोन्याचा गोफ वजन ४ ग्रॅम (१२ हजार), सोन्याचे आेम नग २ प्रत्येकी १ ग्रॅम (एकूण किंमत ६ हजार रुपये). कानातील सोन्याच्या रिंगा नग वजन ६ ग्रँम (किंमत १८ हजार), सोन्याच्या ३ अंगठ्या वजन ३ ग्रँम (किंमत ९ हजार), रोख ३६ हजार रुपये असा एकूण १ लाख २३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोराने चोरून नेल्याचे दिसले.

शेजाऱ्याचेही घर फोडले…
पवार यांच्‍या शेजारी राहणारे श्रीकृष्ण महादेव असंबे यांचेही घर चोरट्यांनी फोडले. त्‍यांच्‍या बेडरुममधील कपाटातील सोन्याचे कानातले (किंमत १९ हजार) व नगदी ५ हजार रुपये असा एकूण २४ हजार रुपयांचा मुद्देमाल कुणीतरी चोरून नेला.