कोरोना “सुटी’वर!; आजही हजेरी नाही!!, जिल्ह्यात उरलेत केवळ १२ सक्रीय रुग्‍ण

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात कोरोना सुटीवर गेला आहे. कालप्रमाणेच आजही, 23 सप्टेंबरला एकही नवा रुग्ण आढळला नाही. सहा रुग्णांना बरे झाल्याने रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 12 आहे. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 875 अहवाल प्राप्त झाले आहेत. पैकी आज एकही पॉझीटिव्ह …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात कोरोना सुटीवर गेला आहे. कालप्रमाणेच आजही, 23 सप्‍टेंबरला एकही नवा रुग्‍ण आढळला नाही. सहा रुग्‍णांना बरे झाल्याने रुग्‍णालयातून डिस्‍चार्ज मिळाला आहे. सध्या उपचार घेत असलेल्या रुग्‍णांची संख्या 12 आहे.

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 875 अहवाल प्राप्त झाले आहेत. पैकी आज एकही पॉझीटिव्ह रुग्ण आढळला नाही. सर्वच 875 अहवाल कोरोना निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 72 तर रॅपिड टेस्टमधील 803 अहवालांचा समावेश आहे.

आजपर्यंत 713636 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86865 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी 848 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आजअखेर एकूण 87550 कोरोनाबाधित रुग्ण असून, जिल्ह्यात सद्यःस्थितीत कोविडचे 12 सक्रीय रुग्ण उपचार घेत आहेत. आजपर्यंत 673 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.