सतत पॉर्न पाहताय… “या’ गंभीर आजारांचा करावा लागेल सामना!

मुंबई : स्वस्त आणि सहज उपलब्ध होणाऱ्या इंटरनेटमुळे पॉर्न पाहणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे चित्र आहे. भारतात अगदी अल्पवयीन मुलेसुध्दा सहज पॉर्न सर्च करत असल्याचे एका अहवालात समोर आले आहे. मात्र सततच्या पॉर्न पाहण्यामुळे अनेक मानसिक व शारीरिक आजारांचा सामना करावा लागू शकतो, असे वैद्यकीय निष्कर्ष डाक्टरांनी काढले आहेत. सतत पॉर्न पाहणाऱ्यांचे लैंगिक जीवन …
 

मुंबई : स्वस्त आणि सहज उपलब्ध होणाऱ्या इंटरनेटमुळे पॉर्न पाहणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे चित्र आहे. भारतात अगदी अल्पवयीन मुलेसुध्दा सहज पॉर्न सर्च करत असल्याचे एका अहवालात समोर आले आहे. मात्र सततच्या पॉर्न पाहण्यामुळे अनेक मानसिक व शारीरिक आजारांचा सामना करावा लागू शकतो, असे वैद्यकीय निष्कर्ष डाक्टरांनी काढले आहेत.

सतत पॉर्न पाहणाऱ्यांचे लैंगिक जीवन गोंधळून जाते. अशा पुरुषांना इरेक्टली डिन्‍स्फक्शन म्हणजेच नपुसंकता या गंभीर आजाराचा सामना करावा लागू शकतो. अलीकडील १० वर्षांत या आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. यातील बहुतांश जणांना सतत पॉर्न पाहण्याची सवय होती. त्यामुळे त्यांच्या स्वतःच्या लैंगिक जीवनात ते गोंधळून गेले, असे अहवालात म्हटले आहे. याशिवाय सतत पॉर्न पाहणारे लोक त्यांच्या लैंगिक जीवनाबद्दल असमाधानी असतात.

ज्या लोकांना पॉर्नचे व्यसन आहे ते त्यांच्या जीवनात अत्यंत वाईटरित्या अपयशी होतात. पॉर्न पाहण्यासाठी एकांत आवश्यक असल्याने सतत एकांतात राहणाऱ्याची आकर्षण शक्ती कमी होते. असे लोक अश्लील कल्पना व अवास्तव अपेक्षांना प्रोत्साहन देतात. पॉर्नमुळे लैंगिक गुन्हे वाढण्याची शक्यता सुद्धा अधिक असते. सतत पॉर्न पाहणाऱ्या लोकांचे सामाजिक जीवन शून्य होण्याची शक्यता असते. निरोगी नातेसंबंध आणि जीवनसाठी पॉर्न पाहण्याची वेळ कमी करावी, असा सल्ला आरोग्यतज्‍ज्ञाकडून नेहमीच दिला जातो.