संभाजी भिडेंचे वादग्रस्त वक्तव्य… सर्व राष्ट्रांत हिंदुस्थान हा बेशरमपणाचा देश!; स्वाभिमान हरवलेले निर्लज्ज लोक राहतात देशात!!
सांगली : सर्व राष्ट्रांत बेशरमपणाचा देश म्हणजे हिंदुस्थान असून, याची कुणाला लाजही वाटत नाही. स्वाभिमान हरवलेल्या निर्लज्ज लोकांचा देश हिंदुस्थान आहे, असे वादग्रस्त वक्तव्य करतानाच, कोरोना थोतांड असून, चीन-पाकिस्तानने भारतावर केलेला हा छुपा वार आहे. हे सरकार दारू दुकाने सुरू करू शकते, मग दुर्गा दौडीला परवानगी का नाकारली, असा प्रश्न शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी केला आहे.
सांगलीत दुर्गामाता दौडचा समारोप करताना ते बोलत होते. भिडे म्हणाले, की आपल्या समाजाचे समस्त मुस्लिम समाजाने आदिलशाही, निजामशही, कुतुबशाहीने नुकसान केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज हिंदू राष्ट्र निर्मितीसाठी त्यावेळी झटले. आता आपण प्रयत्न करण्याची गरज आहे. हिंदू राष्ट्र निर्माण होण्यासाठी हिंदू राष्ट्राची जाण असणारे शासन, सरकार सत्तेत यावे लागणार आहे, असेही भिडे म्हणाले. कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी शिवप्रतिष्ठानची दुर्गा दौड झाली नाही. सांगलीत ध्वजपूजन केल्यानंतर संभाजी भिडे सरकारवर तुटून पडले होते.