संजय राऊतांच्या अंगात आले म्हणून महाविकास आघाडी झाली!; काँग्रेसच्या मंत्र्याने श्रेय दिले की टीका केली, कार्यकर्त्यांनाही कळेना!!
सोलापूर : शरद पवार यांना महाविकास आघाडी सरकारचे शिल्पकार संबोधण्यात येत असले तरी राज्य सरकारमध्ये मंत्री असलेले विश्वजीत कदम यांनी मात्र सरकारचे श्रेय संजय राऊत यांना दिले आहे.
संजय राऊत यांच्या अंगात आल्यामुळेच महाविकास आघाडी अस्तित्वात आल्याचे त्यांचे म्हणणे आहे. सोलापुरात काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भर मेळाव्यात त्यांनी हे विधान केलं. कदम म्हणाले, की मी विधानसभा निवडणुकीत प्रचार करताना सांगत होतो की मी आमदार झालो तरी विरोधी पक्षाचा होणार आहे. कारण केंद्रात नुकतेच मोदींनी बहुमत मिळवले होते. मात्र महाराष्ट्रात वारे बदलले ते संजय राऊत यांच्यामुळे. संजय राऊत यांच्या अंगात आले आणि अशक्य वाटणारा प्रयोग शक्य झाला, असे ते म्हणाले. कदम यांच्या वक्त्यव्यामुळे मेळाव्यात हश्या पिकला.