शिवसेना नगरसेवक म्हणतो साहेब, मला वनमंत्री करा

यवतमाळच्या पदाधिकार्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना अजब साकडे यवतमाळ : पूजा राठोड या तरुणीच्या आत्महत्याप्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर महाविकास आघाडी व विशेषत: शिवसेनेतील अनेक नेत्यांचा डोळा आहे. पण आता यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा येथील एका नगरसेवकाने या पदावर दावा केला आहे. त्याने चक्क मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच पत्र लिहून …
 

यवतमाळच्या पदाधिकार्‍याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना अजब साकडे

यवतमाळ : पूजा राठोड या तरुणीच्या आत्महत्याप्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर महाविकास आघाडी व विशेषत: शिवसेनेतील अनेक नेत्यांचा डोळा आहे. पण आता यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा येथील एका नगरसेवकाने या पदावर दावा केला आहे. त्याने चक्क मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच पत्र लिहून आपल्याला वनमंत्री करण्याची अजब मागणी केली आहे. आपल्याला वनमंत्रालयाची संपूर्ण माहिती असून आपला अभ्यास दांडगा आहे. त्यामुळे तुम्ही मला वनमंत्री कराच, असे या नगरसेवकाचे म्हणणे आहे. रवी तरटे असे या नगरसेवकाचे नाव असून त्यांनी मुख्यमंत्री ठाकरेंना तसे पत्र लिहिले आहे. पत्रात त्यांनी आपण शिवसेनेचे निष्ठावंत पदाधिकारी असून पाच वर्षांपासून पक्षाचे काम करत असल्याचाही दाखला दिला आहे.मंत्री करण्यासाठी आपल्याला विधान परिषदेवर आमदार म्हणून घ्यावे, असे सांगण्यासही तरटे विसरले नाहीत.आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या पक्षाच्या नेत्याची मागणी कितपत मनावर घेतात हे पाहावे लागणार आहे.