वाढदिवसाला बोलावून “सोशल’ मित्रानं केला घात; गुंगीच औषध देत मॉडेल तरुणीवर बलात्कार

मुंबई ः मुंबईमध्ये सोशल मीडियावर ओळख झालेल्या मित्राने पंचतारांकित हॉटेलमध्ये तरुणीला बोलावून बलात्कार केला. बलात्कार करण्याआधी तिला गुंगीचे औषध दिल्याचे पीडितेचे म्हणणे आहे. बलात्कार करून तो निघून गेला. शुद्ध आली तेव्ही हॉटेलच्या रूममध्ये एकटीच होती. आपल्यावर बलात्कार झाल्याचे लक्षात आल्याने तिने वरळी पोलिसांत तक्रार दिली. टिंडर अॅप्लिकेशनवर मॉडेल असलेल्या या तरुणीची ओळख व्यावसायिक असलेल्या तरुणासोबत …
 

मुंबई ः मुंबईमध्ये सोशल मीडियावर ओळख झालेल्या मित्राने पंचतारांकित हॉटेलमध्ये तरुणीला बोलावून बलात्‍कार केला. बलात्‍कार करण्याआधी तिला गुंगीचे औषध दिल्याचे पीडितेचे म्‍हणणे आहे. बलात्‍कार करून तो निघून गेला. शुद्ध आली तेव्ही हॉटेलच्या रूममध्ये एकटीच होती. आपल्यावर बलात्‍कार झाल्‍याचे लक्षात आल्याने तिने वरळी पोलिसांत तक्रार दिली.

टिंडर अॅप्लिकेशनवर मॉडेल असलेल्या या तरुणीची ओळख व्‍यावसायिक असलेल्या तरुणासोबत झाली होती. मॉडेल तरुणी वर्सोवात राहते. दोघेही नियमित चॅटिंग करत होते. गेल्या सोमवारी त्याने वाढदिवस असल्याचे सांगून तिला पंचतारांकित हॉटेलमध्ये बोलावले होते. सायंकाळी सातला ती हॉटेलमध्ये गेली. त्‍यानंतर पिण्यात गुंगीचे औषध देऊन त्‍याने तिच्‍यावर बलात्‍कार केला. घरी गेल्यावर तिला त्रास होत असल्याने रुग्‍णालयात भरती करण्यात आले होते. डॉक्‍टरांनी हे बलात्‍काराचे प्रकरण असल्याने पोलिसांना कळवले. पोलिसांनी तिचा जबाब नोंदवला. आरोपीचे रूम स्‍वतःच्‍या नावावरच बुक केली होती. हा आरोप विदर्भातील असल्याचे सांगण्यात येते. तूर्त तपासाच्‍या कारणास्‍तव त्‍याची ओळख पोलिसांनी जाहीर केलेली नाही.