वयाच्‍या १६ व्या वर्षापासून तिच्‍यावर १५ वर्षे लैंगिक अत्‍याचार!; आधी प्रेम प्रेम म्‍हणत शोषण, नंतर ब्‍लॅकमेल करून मित्रालाही कृत्‍यात केले सहभागी!

धुळे : प्रेम… प्रेम… म्हणत आधी तिच्याशी शरीरसंबंध प्रस्थापित केले. त्या क्षणांचा व्हिडिओ शूट केला. त्या व्हिडिओचा आधार घेऊन नंतर तिला ब्लॅकमेल केले. मित्राला सुद्धा तिच्या शरीराचा उपभोग घेण्याची संधी दिली. तिच्या लग्नानंतर सुद्धा दोन्ही नराधमांनी तिच्यावर अत्याचार सुरूच ठेवले. तब्बल १५ वर्षे अत्याचार सहन केल्यानंतर तिने पोलिसांत धाव घेतली. तिच्यावर झालेल्या अत्याचाराची दर्दभरी कहाणी …
 

धुळे : प्रेम… प्रेम… म्हणत आधी तिच्याशी शरीरसंबंध प्रस्थापित केले. त्या क्षणांचा व्हिडिओ शूट केला. त्या व्हिडिओचा आधार घेऊन नंतर तिला ब्लॅकमेल केले. मित्राला सुद्धा तिच्या शरीराचा उपभोग घेण्याची संधी दिली. तिच्या लग्नानंतर सुद्धा दोन्‍ही नराधमांनी तिच्यावर अत्याचार सुरूच ठेवले. तब्‍बल १५ वर्षे अत्याचार सहन केल्यानंतर तिने पोलिसांत धाव घेतली. तिच्यावर झालेल्या अत्याचाराची दर्दभरी कहाणी एेकून पोलिसही स्तब्ध झाले…

मुख्य आरोपी नाना भदाणे याने धुळ्यातील अवधान परिसरातील एका शाळेचे बांधकाम सुरू असताना पीडितेवर अत्याचार केले. ही घटना आहे २००६ ची. त्यावेळी पीडिता ही केवळ १६ वर्षांची होती. त्यानंतर त्याने वारंवार लैंगिक संबंध ठेवले. त्या क्षणांचे व्हिडिओ शूट करून ठेवले. व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार सुरूच राहिले.

पीडितेचे लग्न झाल्यानंतर कधी सासरी तर कधी माहेरी हा प्रकार सुरूच ठेवला. त्याने त्याच्या एका अन्य साथीदाराला सुद्धा तिच्या शरीराचे लचके तोडण्याची संधी दिली. तो व्हिडिओ व्हायरल करेल, आपली बदनामी होईल, या भीतीपोटी तिने तब्बल १५ वर्षे या नरकयातना सहन केल्या. अखेर सततच्या अत्याचाराला कंटाळून पीडितेने मोहाडी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. पोलीस सध्या दोन्ही आरोपींचा शोध घेत आहेत.