लग्नाला नकार देणार्‍या मुलीची पित्यानेच केली हत्या

सांगली : घरच्यांनी आग्रह धरूनही मुलगी लग्नासाठी तयार होत नसल्याने संतापलेल्या पित्याने डोक्यात खोरे मारून उपवर मुलीलाच यमसदनी धाडले. एवढ्यावरच न थांबता मुलीच्या खुनाची वाच्यता न करता मोजक्या मंडळींना बोलावून मुलीचा गुपचूप अंत्यविधीही उरकला. पण दुसरे दिवशी अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने तो काढून दफन करण्याचा प्रयत्न केला. त्यातून घटनेचा उलगडा झाला व पोलिसांनी आरोपीला …
 

सांगली : घरच्यांनी आग्रह धरूनही मुलगी लग्नासाठी तयार होत नसल्याने संतापलेल्या पित्याने डोक्यात खोरे मारून उपवर मुलीलाच यमसदनी धाडले. एवढ्यावरच न थांबता मुलीच्या खुनाची वाच्यता न करता मोजक्या मंडळींना बोलावून मुलीचा गुपचूप अंत्यविधीही उरकला. पण दुसरे दिवशी अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने तो काढून दफन करण्याचा प्रयत्न केला. त्यातून घटनेचा उलगडा झाला व पोलिसांनी आरोपीला अटक केली.
सांगली जिल्ह्यात आटपाडी तालुक्यात बनपुरी येथे आरोपी उत्तम महादेव चौघुले याची १८ वर्षीय मुलगी ताई हिचे लग्न करण्याचा कुटुंबीयांचा विचार होता. पण ती इतक्यात लग्न करण्यास तयार नव्हती.बराच आग्रह करूनही मुलगी लग्नास तयार होत नसल्याने संतापलेल्या उत्तम चौघुले याने मुलीला शिविगाळ करून माराहण केली. रागाच्या भरात त्याने घरातील खोरे उचलून ते मुलीच्या डोक्यात घतले. यात तिचा जागीच मृत्यू झाला. मुलीचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच रक्ताचे डाग साफ करून मुलीचा हृदयविकाराच्या धक्क्याने तिचा मृत्यू झाल्याचा बनाव करत मोजक्या नातेवाईकांना बोलावून तिचा अंत्यविधीही उरकला. दुसरे दिवशी अर्धवट जळालेला मृतदेह पुरून टाकला. त्यातून ही घटना चव्हाट्यावर आल्यानंतर पोलिसांनी खुनी पित्याला अटक केली.