राहुल गांधींच्या भेटीनंतर नानांना हुरूप! स्वबळाचा आता जोरदार नारा

नवी दिल्ली: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर स्वबळाच्या नाऱ्यावरून मित्रपक्ष नाराज असले, तरी पटोले यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढविण्यासाठी पक्षश्रेष्ठींनी हिरवा कंदील दाखविला आहे. त्यामुळं नानांचा हुरूप आणखी वाढणार आहे. पटोले यांनी दिल्लीत येऊन काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. राहुल यांच्याशी त्यांनी महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संभाव्य निवडणुका …
 

वी दिल्ली: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर स्वबळाच्या नाऱ्यावरून मित्रपक्ष नाराज असले, तरी पटोले यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढविण्यासाठी पक्षश्रेष्ठींनी हिरवा कंदील दाखविला आहे. त्यामुळं नानांचा हुरूप आणखी वाढणार आहे.

पटोले यांनी दिल्लीत येऊन काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. राहुल यांच्याशी त्यांनी महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संभाव्य निवडणुका आदी बाबात चर्चा केली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्यास राहुल यांचा ‘गो अहेड’ चा संदेश मिळाल्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीत बिघाडी झाली आहे. राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना पटोले म्हणाले, की सरकार आणि संघटना या दोन बाबी वेगवेगळ्या आहेत. त्याला सर्वंच पक्षांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे आता त्यावरून वाद होण्याचे काहीच कारण नाही. विधानसभेच्या निवडणुकीला अजून तीन वर्षे आहेत. त्यांच्याबाबत आताच भाष्य करणं चुकीचं आहे; परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे.