यंदाही “गोविंदा आला रेऽऽ’ नाहीच!; दहीहंडीला सरकारने परवानगी नाकारली!!

मुंबई ः यंदाही दहीहंडी उत्सव राज्यात हाेणार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गोविंदा पथकांसोबत घेतलेल्या बैठकीत हा निर्णय घेतला. छोट्या प्रमाणावर का होईना दहीहंडी उत्सव साजरा करू द्या, अशी मागणी करण्यात आली, मात्र कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे भय पाहता या मागणीला मान्यता मिळाली नाही. दुसरीकडे मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेना दहीहंडी उत्सव साजरा करण्यावर ठाम असून, ३१ …
 

मुंबई ः यंदाही दहीहंडी उत्‍सव राज्‍यात हाेणार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गोविंदा पथकांसोबत घेतलेल्या बैठकीत हा निर्णय घेतला. छोट्या प्रमाणावर का होईना दहीहंडी उत्‍सव साजरा करू द्या, अशी मागणी करण्यात आली, मात्र कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे भय पाहता या मागणीला मान्यता मिळाली नाही. दुसरीकडे मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेना दहीहंडी उत्‍सव साजरा करण्यावर ठाम असून, ३१ ऑगस्टला विश्वविक्रमी दहीहंडी फोडू, असे त्‍यांनी जाहीर केले आहे. नेते अभिजित पानसे यांनी तशी पोस्‍ट फेसबुकवर टाकली आहे. मनसेच नाही तर भाजपचे आमदार राम कदम यांनीही दहीहंडी उत्सव साजरा करणार असल्याचे जाहीर केले आहे. त्‍यामुळे दहीहंडीवरूनही आता राजकारण पेटणार असल्याची चिन्‍हे दिसत आहेत. सरकार गोविंदा पथकांवर कसं लक्ष ठेवणार, परवानगी देऊन कोरोनाचा प्रभाव वाढला तर उत्सवाला गालबोट लागेल. यंत्रणांवरील ताण आहे, अशा गोष्टी मुख्यमंत्री ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समजावून सांगितल्या. अखेर गोविंदा पथकांनीही सरकारचा निर्णय मान्य केला.