मुलींनो फसव्या आमिषाला बळी पडू नका; राज्यात ५४१ तरुणींची तस्करी करून त्यांना करायला लावले “ते’ काम

मुंबई : राज्यातील सर्वच जिल्ह्यांत सध्या अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या व तरुणीच्या बेपत्ता होण्याचे घटना वाढल्या आहे. यातील काही जणी प्रेमप्रकरणामुळे घरून निघून जातात तर काही जण लग्नाचे आमिष दाखवून मुलींचे अपहरण करतात. त्यांना फूस लावून पळवून नेतात. मात्र यातील काही मुलींची व तरुणींची देहविक्रीसाठी तस्करी होत असल्याचे धक्कादायक वास्तव एनसीआरबीच्या (राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभाग) वार्षिक …
 

मुंबई : राज्यातील सर्वच जिल्ह्यांत सध्या अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या व तरुणीच्या बेपत्ता होण्याचे घटना वाढल्या आहे. यातील काही जणी प्रेमप्रकरणामुळे घरून निघून जातात तर काही जण लग्नाचे आमिष दाखवून मुलींचे अपहरण करतात. त्यांना फूस लावून पळवून नेतात. मात्र यातील काही मुलींची व तरुणींची देहविक्रीसाठी तस्करी होत असल्याचे धक्कादायक वास्तव एनसीआरबीच्या (राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभाग) वार्षिक अहवालावरून समोर आले आहे.

२०२० या वर्षात मानवी तस्करीचे तब्बल १ हजार ६५१ गुन्हे दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. यात चार हजार सातशे नऊ तरुणी आणि अल्पवयीन मुलींचा समावेश आहे. विशेष धक्कादायक बातमी म्हणजे या गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रातून ४४ अल्पवयीन मुली, ५५० तरुणींची देहविक्रीचा व्यवसायासाठी तस्करी करण्यात आल्याची नोंद आहे. काही मुली नशीब आजमावण्यासाठी मुंबई गाठतात. त्यांना सिरियलमध्ये किंवा वेबसिरीजमध्ये काम देण्याचे आमिष दाखवले जाते. झगमगत्या चंदेरी दुनियेच्या आकर्षणापायी अनेक मुली अशा आमिषाला बळी पडतात. नवख्या मुलींना टार्गेट करण्यावर तस्करी करणाऱ्यांचा डोळा असतो. काही मुलींना मुंबईत हायप्रोफाईल जीवनशैली मेंटेन करण्यासाठी नाईलाजाने या व्यवसायात उतरावे लागते. त्यामुळे या व्यवसायात त्या अधिकच गुंतल्या जातात. या व्यवसायातून सुटका झालेल्या काही तरुणींनी पोलिसांसमोर ही व्यथा बोलून दाखविली.