मुली भाव देत नाहीत… तरुणाने लिहिले आमदारांना पत्र

चंद्रपूर : नागरिक आपल्या समस्या मांडण्यासाठी लोकप्रतिनिधींना निवेदने देत असतात. आमदार ,खासदारांनी आपल्या समस्या सोडवाव्या असे नागरिकांना वाटत असते. कुणाच्या शेताच्या, रस्त्याच्या, पाण्याच्या अशा अनेक समस्या नेतेमंडळीकडे येत असतात. मात्र चंद्रपूर जिल्ह्यातील बाजूरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांना पत्र लिहून एका तरुणाने भलतीच मागणी केली आहे. अर्थात हे पत्र आमदारांना पाठविले नसून, ते लिहून …
 

चंद्रपूर : नागरिक आपल्या समस्या मांडण्यासाठी लोकप्रतिनिधींना निवेदने देत असतात. आमदार ,खासदारांनी आपल्या समस्या सोडवाव्या असे नागरिकांना वाटत असते. कुणाच्या शेताच्या, रस्त्याच्या, पाण्याच्या अशा अनेक समस्या नेतेमंडळीकडे येत असतात. मात्र चंद्रपूर जिल्ह्यातील बाजूरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांना पत्र लिहून एका तरुणाने भलतीच मागणी केली आहे. अर्थात हे पत्र आमदारांना पाठविले नसून, ते लिहून सोशल मीडियावर व्हायरल केले आहे.

संपूर्ण तालुक्यात भरपूर मुली असून, मला एकही गर्लफ्रेंड नाही ही चिंतेची बाब आहे. मला एकही मुलगी भाव देत नाही, असे तरुणाने लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. भूषण जामुवंत राठोड असे पत्र लिहिणाऱ्या तरुणाचे नाव असून तो कोण आहे, कुठला आहे याचा मात्र पत्ताच नाही. मी खेडेगावातील आहे. रोज गडचांदूर येथे फेरी मारतो. परंतु मला एकही मुलगी पटत नाही. माझा आत्मविश्वास खचला आहे. दारू विकणाऱ्यांना, काळ्या डोमळ्यांना गर्लफ्रेंड असते हे पाहून माझा जीव जळून राख होतो, असे त्याने पत्रात लिहिले आहे. विधानसभा क्षेत्रातील मुलींनी आमच्यासारख्यांना सुद्धा भाव द्यावा यासाठी तुम्ही युवतींना प्रोत्साहन द्या, अशी मागणी सुद्धा या पत्रात करण्यात आली आहे. आपल्याला पत्र मिळाले नसून, ते सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे आमदारांनी सांगितले. भूषणचा शोध घ्यायला कार्यकर्त्यांना सांगितले आहे, तो सापडलाच तर त्याची विचारपूस करून समस्या दूर करता येईल, असे आमदार म्हणाले.