मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्‍याविरुद्ध खंडणीचा गुन्हा

मुंबई ः माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटी रुपयांच्या खंडणी वसुलीचा आरोप करणारे मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अडचणी कमी होत नाहीत. त्यांच्यावर आता खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. मरीन ड्राईव्ह पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केल्यानं परमबीर अडचणीत आले आहेत. ठाण्यातील बांधकाम व्यावसायिक श्यामसुंदर अग्रवाल यांनी परमबीर व अन्य पोलिस अधिकाऱ्यांविरोधात खंडणीची …
 

मुंबई ः माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटी रुपयांच्या खंडणी वसुलीचा आरोप करणारे मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अडचणी कमी होत नाहीत. त्यांच्यावर आता खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. मरीन ड्राईव्ह पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केल्यानं परमबीर अडचणीत आले आहेत.

ठाण्यातील बांधकाम व्यावसायिक श्यामसुंदर अग्रवाल यांनी परमबीर व अन्य पोलिस अधिकाऱ्यांविरोधात खंडणीची फिर्याद दिली होती. त्यात आठ जणांची नावे आहेत. परमबीर यांच्यासह इतर सहा जणांचा त्यात समावेश आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात दोन जणांना अटक करण्यात आली असल्याने प्रकरणातील गांभीर्य वाढले आहे. प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या इमारतीसमोर स्फोटके भरलेली गाडी ठेवण्यात आली. यातील सचिन वाझे याला अटक करण्यात आली आहे. वाझे थेट परमबीर यांना रिपोर्टिंग करायचे. त्यामुळे परमबीर यांना मुंबईच्या आयुक्तपदावरून हटवून त्यांची इतरत्र बदली करण्यात आली; परंतु बदलीच्या ठिकाणी हजर न होता राजीनामा देऊन परमबीर यांनी देशमुख यांच्यावर आरोप केले होते. या प्रकरणाचा सध्या ईडी व सीबीआय तपास करीत आहेत; परंतु परमबीर यांच्या विरोधातही त्यानंतर अनेक तक्रारी आल्या. त्यात काही तक्रारी तर पोलिस अधिकाऱ्यांनी केल्या आहेत.