महिलेची छळवणूक; संजय राऊतांवरील आरोपाचा निकाल राखीव

मुंबई ः शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांच्यावर एका महिलेने छळवणुकीच्या केलेल्या तीनही याचिकांची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात पूर्ण झाली. राऊत यांच्याविरोधातील याचिकांवरचा निकाल न्यायालयाने राखून ठेवला. राऊत यांनी आपला छळ केला. जीवे मारण्याची धमकी दिली, असा आरोप या महिलेने केला आहे. त्याबाबतच्या याचिकेची सुनावणी न्या. संभाजी शिंदे व न्या. निजामुद्दीन जमादार यांच्या खंडपीठात …
 

मुंबई ः शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांच्यावर एका महिलेने छळवणुकीच्या केलेल्या तीनही याचिकांची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात पूर्ण झाली. राऊत यांच्याविरोधातील याचिकांवरचा निकाल न्यायालयाने राखून ठेवला.

राऊत यांनी आपला छळ केला. जीवे मारण्याची धमकी दिली, असा आरोप या महिलेने केला आहे. त्याबाबतच्या याचिकेची सुनावणी न्या. संभाजी शिंदे व न्या. निजामुद्दीन जमादार यांच्या खंडपीठात पूर्ण झाली. न्यायालयाने निर्णय राखून ठेवला. या महिलेचा राऊत आणि तिच्या पतीविरोधातही आरोप आहे. राऊत आणि माझे पती सुजीत पाटकर यांच्या सांगण्यावरून काही व्यक्तींनी छळवणूक केली. वाकोला आणि माहीम पोलिस ठाण्यात वारंवार फिर्याद देऊनही पोलिसांनी दखल घेतली नाही, असा या महिलेचा आरोप आहे. पोलिस काहीच करीत नसल्यानं या महिलेनं अॅड. आभा सिंग यांच्यामार्फत तीन याचिका दाखल केल्या. राऊत यांनी ज्येष्ठ वकील अॅड. प्रसाद ढाकेफाळकर यांच्यामार्फत म्हणणे मांडले. त्यांनी सर्व आरोपांचे खंडन केले. पोलिसांनी एका प्रकरणात न्यायालयात आरोपपत्र दाखल केले असून, दोन प्रकरणांत ए-समरी अहवाल दाखल केले आहेत, अशी माहिती मुख्य सरकारी वकील अरुणा पै यांनी खंडपीठाला दिली.