महिना ३० दिवसांचा, सुट्या आल्या १०
देशात अर्धा महिना बँका राहणार बंद; ग्राहकांचे होणार वांधेमुंबई : पूर्वी सुटीला सुटी जोडून आली की लोक पर्यटनासाठी बाहेर पडत असत. पण कोरोनाने बाहेरचे फिरणे बंदच केले आहे. त्यातही लॉकडाऊन व वर्क फ्रॉम होममुळे अनेकांना सक्तीची सुटी अनुभवावी लागत आहे. त्याला जोडून सरकारी सुट्या आल्याने लोकांवर आता नको रे बाबा सुटी असे म्हणण्याची वेळ आली …
Apr 2, 2021, 15:25 IST
देशात अर्धा महिना बँका राहणार बंद; ग्राहकांचे होणार वांधे
मुंबई : पूर्वी सुटीला सुटी जोडून आली की लोक पर्यटनासाठी बाहेर पडत असत. पण कोरोनाने बाहेरचे फिरणे बंदच केले आहे. त्यातही लॉकडाऊन व वर्क फ्रॉम होममुळे अनेकांना सक्तीची सुटी अनुभवावी लागत आहे. त्याला जोडून सरकारी सुट्या आल्याने लोकांवर आता नको रे बाबा सुटी असे म्हणण्याची वेळ आली आहे. एप्रिल महिना ३० दिवसांचा असून त्यात देशभरात तब्बल १४ तर महाराष्ट्रात १० सार्वजनिक सुट्या आल्या आहेत. या काळात बँका बंद राहणार असल्याने त्याचा परिणाम आर्थिक व्यवहारांवर होणार आहे.त्यामुळे एप्रिल महिन्यात बँकेत जाण्याआधी बँक सुरू आहे ना? याची खात्री करूनच बँकेची पायरी चढा, असा सल्ला आहे.
एप्रिलमध्ये बँकांना असतील या दिवशी सुट्ट्या
- २ एप्रिल – गुड फ्रायडे
- ४ एप्रिल – रविवार
- ५ एप्रिल – आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये बाबू जगजीवन राम जयंतीनिमित्त बँकाना सुट्टी असेल.
- ६ एप्रिल – तामिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुकांमुळं बँका बंद असतील.
- १० एप्रिल -दुसरा शनिवार असल्याने बँका बंद
- ११ एप्रिल – रविवार असल्याने बँका बंद
- १३ एप्रिल – गुढी पाडवानिमित्त बँकांना सुट्टी
- १४ एप्रिल – बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सुट्टी
- १५ एप्रिल – हिमाचल दिन, बंगाली नवीन वर्ष, बोहाग बिहू आणि सरहुल निमित्त संबंधित राज्यांमध्ये बँका बंद राहतील.
- १६ एप्रिल – बोहाग बिहूनिमित्त बँका बंद राहतील.
- १८ एप्रिल – रविवार असल्याने बँका बंद
- २१ एप्रिल- रामनवमी निमित्त बँकां बंद
- २४ एप्रिल – चौथ्या शनिवारमुळे बँका बंद
- २५ एप्रिल – रविवार असल्याने बँका बंद