महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावूनच दाखवा

संजय राऊत यांचे भाजपला आव्हान मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर टाकलेला लेटरबॉम्ब तसेच सचिन वाझे प्रकरणामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकारची अवस्था सुरुवातीला हडबडल्यासारखी झाली होती.पण बैठकांवर बैठका घेऊन वरिष्ठ नेत्यांनी यातून बाहेर पडण्याची रणनीती ठरवली. या आरोपांनां प्रत्युत्तर देत हे भाजपचेच कटकारस्थान असल्याचा प्रतिहल्ला शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी …
 

संजय राऊत यांचे भाजपला आव्हान

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर टाकलेला लेटरबॉम्ब तसेच सचिन वाझे प्रकरणामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकारची अवस्था सुरुवातीला हडबडल्यासारखी झाली होती.पण बैठकांवर बैठका घेऊन वरिष्ठ नेत्यांनी यातून बाहेर पडण्याची रणनीती ठरवली. या आरोपांनां प्रत्युत्तर देत हे भाजपचेच कटकारस्थान असल्याचा प्रतिहल्ला शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आला आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी तर सामना दैनिकातील अग्रलेखात हे सरकार पाडून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची भाजपची धडपड आहे. पण राज्यात राष्ट्रपती राजवट लावूनच दाखवा. सरकारकडे अजूनही चांगले बहुमत आहे. बहुमतावर कुरघाडी कराल तर आग लागेल. हा इशारा नसून वस्तुस्थिती आहे. एखाद्या अधिकार्‍यामुळे सरकारे येत नाहीत व कोसळतही नाहीत, हे विरोधकांनी विसरू नये. कालपरवापर्यंत परमबीरसिंग यांच्यावर विरोधकांना विश्वास नव्हता. ते बेभरवशाचे अधिकारी असल्याचे विरोधक म्हणत होते. पण आत त्यांच्याच खांद्यावर बंदूक ठेवून सरकारची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न होत आहे, असं राऊत यांनी म्हटले आहे.

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा : प्रकाश आंबेडकर
वंचित बहुजन विकास आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनीही राज्यात राष्ट्रपती शासन लागू करण्याची मागणी केली आहे. याप्रकरणी आपण राज्यपालांना भेटून तशी मागणी करणार असल्याचेही आंबेडकर यांनी स्पष्ट केले आहे. संजय राऊत यांनी आंबेडकरांच्या या मागणीवरही टीका केली आहे. विरोधी पक्ष सरकारवर दबाव टाकून किंवा एखाद्या प्रकरणावरून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करू शकत नाही. किंबहुन केंद्र सरकारच बरखास्त करण्याची गरज आहे. कारण हा राज्याच्या स्वायत्ततेवर घाला आहे, असाही आरोप राऊत यांनी केला आहे.