भाजपचा कोणता ‘सिंह’ विधान परिषेदवर जाणार?

मुंबई : मुंबई महानगरपालिकेवरून विधान परिषेदवर निवडून द्यायच्या दोन जागांसाठी डिसेंबरमध्ये निवडणूक होणार आहे. एका जागेवर शिवसेना तर दुसऱ्या जागेवर भाजपचा उमेदवार निवडून जाऊ शकतो. भाजपतून दोन विधान परिषेदवर निवडून जाण्यासाठी दोन ‘सिंह’ इच्छुक आहेत. त्यापैकी कोणत्या सिंह यांची निवड होते, हे पाहण्यासाठी डिसेंबरपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. काँग्रेसमधून भाजपत आलेले माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंह …
 

मुंबई : मुंबई महानगरपालिकेवरून विधान परिषेदवर निवडून द्यायच्या दोन जागांसाठी डिसेंबरमध्ये निवडणूक होणार आहे. एका जागेवर शिवसेना तर दुसऱ्या जागेवर भाजपचा उमेदवार निवडून जाऊ शकतो. भाजपतून दोन विधान परिषेदवर निवडून जाण्यासाठी दोन ‘सिंह’ इच्छुक आहेत. त्यापैकी कोणत्या सिंह यांची निवड होते, हे पाहण्यासाठी डिसेंबरपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

काँग्रेसमधून भाजपत आलेले माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंह आणि राजहंस सिंह या दोघांत ही स्पर्धा आहे. दोघेही विधान परिषदेवर जाण्यासाठी इच्छुक आहेत. या निवडणुकीसाठी नगरसेवक मतदान करतात. पहिल्या पसंतीची 77 मते मिळालेला उमेदवार निवडून येतो. भाजपकडे 83 नगरसेवकांचे बळ आहे. त्यामुळे यंदा भाजपच्या एका उमेदवाराचा विजय निश्चित आहे. आगामी महानगर पालिका निवडणुका लक्षात घेऊन भाजपकडून उत्तर भारतीय चेहरा विधानपरिषदेसाठी पुढे केला जाण्याची शक्यता आहे. मुंबई महानगर पालिका निवडणुकीसाठी उत्तर भारतीयांची मतं महत्त्वाची आहेत. त्यामुळे काँग्रेसचे माजी आमदार, की महापालिकेतील विरोधी पक्षनेते या दोन सिंहामधून भाजप कुणाची निवड करते, हे आता पाहायचे. कृपाशंकर सिंह यांनी काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला.

राज्यातील नेतृत्व त्यांना प्रवेश देण्यास तयार नव्हते; मात्र कृपाशंकर यांनी थेट दिल्लीतून प्रयत्न केल्याने त्यांचा पक्षात प्रवेश झाला आहे. आता तेही विधानपरिषदेसाठी इच्छुक आहेत. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यापासूनच ही खुर्ची मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे आता दोन्ही “सिंह’या स्पर्धेत उतरले आहेत. राजहंस आणि कृपाशंकर हे दोघेही काँग्रेसमधून भाजपमध्ये आले आहेत. राजहंस सिंह यांचे भाजपच्या राज्यातील नेत्यांशी अत्यंत जवळचे संबंध आहेत;. मात्र आता कृपाशंकर सिंह यांच्यामुळे चुरस वाढली आहे. राज्य नेतृत्वाकडून या निवडणुकीसाठी काही इच्छुकांची नावे दिल्लीत पक्ष नेतृत्वाकडे पाठवली जातील. त्यातून एकाची निवड दिल्लीतून होईल असे सांगण्यात आले.