पोलिसांनी कपडे फाटेपर्यंत बदडलं, पण पक्षात बक्षीस मिळालं…; युवा सेनेत सहसचिव म्‍हणून बढती!

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांविरुद्ध केलेल्या वक्तव्यानंतर संतप्त शिवसैनिकांनी राज्यभर आंदोलन केले. राणेंच्या जुहूतील बंगल्यासमोरही युवा सेनेने आंदोलन केले. मात्र त्यांना रोखण्यासाठी राणेंचे समर्थकही सरसावले आणि राडा झाला. यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करत राडा करणाऱ्यांना चोप दिला. यात युवासैनिक मोहसील शेखही होता. मार खाण्याचे बक्षीस त्याला मिळाले असून, सहसचिवपदी त्याची नियुक्ती करण्यात आली …
 

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांविरुद्ध केलेल्या वक्‍तव्‍यानंतर संतप्‍त शिवसैनिकांनी राज्‍यभर आंदोलन केले. राणेंच्‍या जुहूतील बंगल्यासमोरही युवा सेनेने आंदोलन केले. मात्र त्‍यांना रोखण्यासाठी राणेंचे समर्थकही सरसावले आणि राडा झाला. यावेळी पोलिसांनी मध्यस्‍थी करत राडा करणाऱ्यांना चोप दिला. यात युवासैनिक मोहसील शेखही होता. मार खाण्याचे बक्षीस त्‍याला मिळाले असून, सहसचिवपदी त्‍याची नियुक्‍ती करण्यात आली आहे. कपडे फाटेपर्यंत मोहसीनला पोलिसांनी बदडलं होतं. तो जखमीही झाला होता, त्‍याला मारहाण होतानाची व्‍हिडिओ क्‍लिपही व्हायरल झाली होती. विशेष म्‍हणजे मोहसीन सेनेत असला तरी त्‍याची पत्नी नादिया शेख ही राष्ट्रवादी काँग्रेसची शिवाजीनगर, मानखूर्द वॉर्डाची नगरसेविका आहे. पती राष्ट्रवादीत तर चार वर्षांपासून मोहसीन सेनेत आहे.