पेट्रोल दरवाढीला कंटाळून युवकाने जाळली दुचाकी
लातूर : देशात पेट्रोल डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. या वाढत्या दरवाढीला कंटाळून एका युवकाने चक्क त्याची महागडी दुचाकीच जाळून टाकल्याचा धक्कादायक प्रकार लातूर जिल्ह्यात घडला आहे. लातूर जिल्ह्यातील खोपेगाव (ता.लातूर )येथील तरुण अक्षय कमलाकर मोरे याने काही दिवसांपूर्वी महागडी स्पोर्ट बाईक खरेदी केली होती. पण तिचे अॅव्हरेज कमी होते. दरवाढीमुळे ही दुचाकी वापरणे त्याला …
Mar 13, 2021, 14:48 IST
लातूर : देशात पेट्रोल डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. या वाढत्या दरवाढीला कंटाळून एका युवकाने चक्क त्याची महागडी दुचाकीच जाळून टाकल्याचा धक्कादायक प्रकार लातूर जिल्ह्यात घडला आहे. लातूर जिल्ह्यातील खोपेगाव (ता.लातूर )येथील तरुण अक्षय कमलाकर मोरे याने काही दिवसांपूर्वी महागडी स्पोर्ट बाईक खरेदी केली होती. पण तिचे अॅव्हरेज कमी होते. दरवाढीमुळे ही दुचाकी वापरणे त्याला परवडेनासे झाले होते. शिवाय ती पुन्हा त्याच्याकडून विकलीही जात नव्हती. त्यामुळे वैतागून त्याने दुचाकीवर पेट्रोल ओतून ती पेटवून दिली. इंधन दरवाढीमुळे आपण हा निर्णय घेतल्याचे अक्षय मोरे याने सांगितले. त्याच्या या कृतीची जिल्हाभर चर्चा सुरू आहे.