पुणे : लग्नास नकार देणार्या प्रेयसीच्या डोक्यात घातला दगड
खुनी प्रियकरास पोलिसांनी ठोकल्या बेड्या
पुणे : दहा वर्षांपासून प्रेमसंबंध होते. सोबत फिरलो, मजा केली, तरीही प्रेयसीने लग्नास नकार दिल्याने संतापलेल्या प्रियकराने प्रेयसीच्या डोक्यात दगड घालून तिचा खून केला. बॉयफ्रेंड व्यसनी असून त्याचा स्वभाव वाईट असल्याने प्रेयसीने त्याच्यासोबत लग्नास नकार दिला. परंतु हा नकार तिच्या जीवावर बेतला. नकाराची किंमत प्रियकराने तिचा खून करून वसूल केली.
ही घटना सांस्कृतिक राजधानी पुण्यात घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसारा मनिषा बाबूराव गेडाम (३०,रा.वडगाव शेरी,मूळ गाव अमरावती) व सागर गुंडव (३०,रा.चांदूरबाजार, अमरावती) हे दोघे मित्र होते. एकाच जिल्ह्यातील असल्याने त्यांची चांगली मैत्री होती. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यांनी भविष्यात लग्न करण्याचे ठरविले. तब्बल दहावर्षे त्यांचे प्रेमसंबंध टिकून होते. परंतु नंतर नंतर त्यांच्यात खटके उडू लागले.सागरला अनेक व्यसने असल्याने व त्याचा स्वभाव वाईट असल्याने मनिषाने त्याच्यासोबत लग्न करण्यास नकार दिला. पण दहा वर्षे सोबत राहून मुलगी लग्नास नकार देत असल्याने सागरला सहन झाले नाही. १३ मार्च २०२१ रोजी मनिषाला फोन करून सागरने वडगाव शेरीत बोलावून घेतले. त्यावेळी तिची मैत्रिण सोबत होती. काहीवेळानंतर ते दोघे दुचाकीवरून निघून गेले. त्यानंतर मनिषा परत आलीच नाही. मैत्रिणीने ही माहिती तिच्या आईला दिली. आईने चंदननगर पोलिस ठाण्यात मुलीच्या अपहरणाची तक्रार दाखल केली. त्याआधारे पोलिसांनी तपास केला. त्यात आरोपी अमरावती कारागृहात शिक्षा भोगत असल्याचे समजले. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता डोक्यात दगड घालून मनिषाचा खून केल्याची कबुली त्याने दिली. त्यानंतंर पोलीसांनी मुलीचा मृतदेह ताब्यात घेतला.