पुणे, अंबडमध्ये भीषण आग; कोट्यवधींचे नुकसान

अंबडमध्ये आरोग्यमंत्री टोपेंच्या ताब्यातील सुतगिरणी खाकजालना : जालना जिल्ह्यातील अंबड येथील सुतगिरणीला मंगळवारी पहाटे भीषण आग आली.या आगीत कापसाच्या शेकडो गाठींसह मशिनरी युनिट खाक झाल्याने कोट्यवधींचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. ही आग इतकी भीषण होती की, त्याच्या ज्वाळा अंबड शहरातूनही पाहवयास मिळत होत्या.सुदैवाने आग पहाटे लागल्याने त्यात कुठलीही जीवित हानी झाली नाही. ही सुतगिरणी …
 

अंबडमध्ये आरोग्यमंत्री टोपेंच्या ताब्यातील सुतगिरणी खाक
जालना :
जालना जिल्ह्यातील अंबड येथील सुतगिरणीला मंगळवारी पहाटे भीषण आग आली.या आगीत कापसाच्या शेकडो गाठींसह मशिनरी युनिट खाक झाल्याने कोट्यवधींचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. ही आग इतकी भीषण होती की, त्याच्या ज्वाळा अंबड शहरातूनही पाहवयास मिळत होत्या.सुदैवाने आग पहाटे लागल्याने त्यात कुठलीही जीवित हानी झाली नाही. ही सुतगिरणी आरोग्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेश टोपे यांच्या ताब्यात आहे. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. पण त्यादृष्टीने तपास सुरू आहे.
एका अन्य घटनेत पुण्यात कॅन्टोमेन्ट परिसरात छत्रपती शिवाजी महाराज मार्केटला मंगळवारी पहाटे भीषण आग लागली. त्यात मच्छिमारांची सुमारे २५ दुकाने पूर्णपणे जळून खाक झाली. यात लाखो रुपयांचे नुकसान झाले. अग्निशमन विभागाच्या आठ बंबांनी ही आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. हे मार्केट ब्रिटीशकालीन म्हणजे जवळपास २०० वर्षे जुने असून तेथे मासे, चिकन विक्रेते तसे फळे व भाजीपाला विक्री केली जाते.