निवृत्त ACP असल्याची बतावणी… सॉफ्टड्रिंकमध्ये गुंगीचे औषध टाकून शिक्षिकेवर बलात्कार, ६०वर्षीय वृद्धाविरुद्ध गुन्हा

पुणे : निवृत्त ACP असल्याची बतावणी करून शिक्षिकेला व्याजाने पैसे देण्याचे आमिष दाखवत बलात्कार करण्यात आल्याची घटना पुणे येथे उघडकीस आली आहे. पीडित शिक्षिकेच्या तक्रारीवरून विकास अवस्ती या ६० वर्षीय वृद्धाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.पीडित शिक्षिकेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, शिक्षिकेला पैशांची गरज होती. त्यामुळे तिने अवस्तीकडे पैशांची मागणी केली. …
 

पुणे : निवृत्त ACP असल्याची बतावणी करून शिक्षिकेला व्याजाने पैसे देण्याचे आमिष दाखवत बलात्कार करण्यात आल्याची घटना पुणे येथे उघडकीस आली आहे. पीडित शिक्षिकेच्या तक्रारीवरून विकास अवस्ती या ६० वर्षीय वृद्धाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
पीडित शिक्षिकेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, शिक्षिकेला पैशांची गरज होती. त्यामुळे तिने अवस्तीकडे पैशांची मागणी केली. दहा टक्के व्याजाने तुला पैसे देतो, असे म्हणत अवस्तीने तिला त्याच्या घरी बोलावले. व्याजाने पैसे देण्यासाठी कोरे धनादेश आणि कागदावर सह्या घेतल्या. त्यानंतर शिक्षिकेला सॉफ्टड्रिंक प्यायला दिले. सॉफ्ट ड्रिंकमध्ये अवस्तीने गुंगीचे औषध टाकल्याने शिक्षिकेला भोवळ आली. त्यानंतर अवस्तीने तिच्यावर बलात्कार करून तिचे अश्लील फोटो मोबाईलमध्ये काढले. शिक्षिकेला शुद्ध आल्यावर “तू याबद्दल कुणाला काही सांगितले तर तुझ्या घरच्यांना मारून टाकीन. मी रिटायर्ड एसीपी आहे. माझे कुणी काहीही वाकडे करू शकत नाही.’ अशी धमकी दिली व पैसे न देताच परत पाठविले, असे तक्रारीत म्हटले आहे.