नर्सिंग महाविद्यालयात तरुणीची रॅगिंग, कपडे काढायला लावले!; शिक्षकानेही काढली छेड

नांदेड : नर्सिंग महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या एका १९ वर्षीय तरुणीची रॅगिंग करण्यात आली. या प्रकाराची तक्रार देण्यासाठी ही तरुणी शिक्षकाकडे गेली असता त्यानेही तिची छेड काढली. नांदेड जिल्ह्यातील हदगाव येथे ही घटना घडली. पीडित तरुणीच्या तक्रारीवरून ३ तरुणींवर रॅगिंगचा तर शिक्षकाविरुद्ध छेड काढल्याप्रकरणी हदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हदगाव येथील नर्सिंग महाविद्यालयात …
 

नांदेड : नर्सिंग महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या एका १९ वर्षीय तरुणीची रॅगिंग करण्यात आली. या प्रकाराची तक्रार देण्यासाठी ही तरुणी शिक्षकाकडे गेली असता त्‍यानेही तिची छेड काढली. नांदेड जिल्ह्यातील हदगाव येथे ही घटना घडली. पीडित तरुणीच्या तक्रारीवरून ३ तरुणींवर रॅगिंगचा तर शिक्षकाविरुद्ध छेड काढल्याप्रकरणी हदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हदगाव येथील नर्सिंग महाविद्यालयात आठवडाभरापूर्वी पीडित १९ वर्षीय तरुणीने प्रवेश घेतला होता. ती महाविद्यालयाच्या होस्टेलमध्ये राहत होती. १२ सप्टेंबर रोजी कॉलेजच्या ३ तरुणींनी तिची रॅगिंग केली. तिला कपडे काढायला लावले, नाक घासायला लावले व झाडू मारायला लावला. या प्रकाराची तक्रार देण्यासाठी ती शिक्षकाकडे गेली असता त्यांनीही तिची छेड काढली, असे तक्रारीत म्हटले आहे.