धक्‍कादायक… आधी तरुणाचा महिलेवर बलात्‍कार; नंतर त्‍याच्‍या मैत्रिणीनेही तिच्‍यासोबत ठेवले समलिंगी संबंध!

अमरावती : ३३ वर्षीय महिलेच्या घरात घुसून तरुणाने लैंगिक अत्याचार केला. या कृत्यात त्याच्या १९ वर्षीय मैत्रिणीने त्याला साथ दिली. त्याने बलात्कार केल्यानंतर तिनेही या महिलेसोबत जबरदस्ती समलिंगी संबंध ठेवले. अमरावती शहरातील गाडगेनगर भागात १७ सप्टेंबर रोजी ही घटना घडली. या प्रकरणी काल, १९ सप्टेंबरला तरुण आणि त्याच्या मैत्रिणीला अटक करण्यात आली आहे. निखिल टकले …
 

अमरावती : ३३ वर्षीय महिलेच्या घरात घुसून तरुणाने लैंगिक अत्याचार केला. या कृत्यात त्याच्या १९ वर्षीय मैत्रिणीने त्याला साथ दिली. त्‍याने बलात्‍कार केल्यानंतर तिनेही या महिलेसोबत जबरदस्ती समलिंगी संबंध ठेवले. अमरावती शहरातील गाडगेनगर भागात १७ सप्टेंबर रोजी ही घटना घडली. या प्रकरणी काल, १९ सप्‍टेंबरला तरुण आणि त्‍याच्‍या मैत्रिणीला अटक करण्यात आली आहे.

निखिल टकले असे आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह त्याच्या १९ वर्षीय मैत्रिणीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पीडित महिलेच्या पतीचे या १९ वर्षीय तरुणीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय महिलेला होता. त्यामुळेच तरुणीने तिच्या मित्राला महिलेवर लैंगिक अत्याचार करायला लावला. यावेळी तरुणीनेसुद्धा तिच्‍यासोबत समलिंगी संबंध प्रस्‍थापित केले, असे पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या घटनेमुळे अमरावती शहरात खळबळ उडाली आहे.