दोन मुलांची आई असलेल्या विवाहितेवर १० वर्षांनी लहान तरुणाचा लैंगिक अत्याचार, आठ महिन्यांची झाली गर्भवती!
वर्धा : दोन मुलांची आई असलेल्या विवाहितेवर तिच्यापेक्षा १० वर्षांनी लहान असलेल्या तरुणाने लैंगिक अत्याचार केला. यातून महिला आठ महिन्यांची गर्भवती राहिली, अशी तक्रार पीडित महिलेने आर्वी पोलीस ठाण्यात १२ सप्टेंबर रोजी दिली आहे.
तक्रारीवरून आरोपी हरीश किंधरले (२४, रा. दाऊतनगर, आर्वी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार हरीश आणि ती एकाच ठिकाणी कामाला होते. त्यातून दोघांची ओळख व जवळीक वाढली. त्याने तिचा विश्वास संपादन केला. जानेवारी २०२१ मध्ये त्याने तिला पुलगाव (जि. वर्धा) येथे नेले. तेथील लॉजमध्ये बळजबरी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर तिला बदनामीची भीती दाखवून तिच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. आर्वी शहरातील संतोषी माता मंदिरालगतच्या सुनसान जागेवर तिला बोलावून तिच्यासोबत अनेकदा बळजबरी शरीरसंबंध प्रस्थापित केले. त्यातून ती आठ महिन्यांची गर्भवती राहिली, असे तक्रारीत म्हटले आहे.