दर पाडल्‍याने संतप्‍त शेतकऱ्याने ट्रॉलीभर मिरची वाटली फुकटात!

सांगली ः मेहनतीने पिकवलेल्या ढबू मिर्चीचा कवडीमोल दर मिळत असल्याचे पाहून संतप्त शेतकऱ्याने ही ट्रॉलीभर मिरची फुकटात लोकांना वाटून टाकली. विशेष म्हणजे अवघ्या २० मिनिटांत ट्रॉली खाली झाली. भीमराव साळुंखे असे या शेतकऱ्याचे नाव असून, सांगलीच्या कडेगाव तालुक्यातील कुंभारगाव बाजारपेठेत हा प्रकार घडला.साळुंखे दरवर्षी २५ गुंठ्यांत ढोबळी मिरचीचे पीक घेतात. मुंबई, पुणे येथे ते मिरची …
 

सांगली ः मेहनतीने पिकवलेल्या ढबू मिर्चीचा कवडीमोल दर मिळत असल्याचे पाहून संतप्‍त शेतकऱ्याने ही ट्रॉलीभर मिरची फुकटात लोकांना वाटून टाकली. विशेष म्‍हणजे अवघ्या २० मिनिटांत ट्रॉली खाली झाली. भीमराव साळुंखे असे या शेतकऱ्याचे नाव असून, सांगलीच्‍या कडेगाव तालुक्यातील कुंभारगाव बाजारपेठेत हा प्रकार घडला.
साळुंखे दरवर्षी २५ गुंठ्यांत ढोबळी मिरचीचे पीक घेतात. मुंबई, पुणे येथे ते मिरची पाठवतात. वाहतूक, पॅकिंग, मजुरी धरून किलोमागे त्‍यांना ६ रुपये तरी खर्च येतो. १५ रुपये दर मिळाला तरी ९ रुपये किलोमागे नफा मिळतो. मात्र कुंभारगावमध्ये ट्रॉलीभर मिरची आणल्यानंतर ५ रुपये सुद्धा दर मिळाला नाही. सर्व व्‍यापारी अडवणूक करत असल्याने साळंुखे संतप्‍त झाले. त्‍यांनी गावात मिरची फुकटात वाटप करणे सुरू केले. फुकटात मिळत असल्याने आजूबाजूच्‍या गावांतील लोकांनीही ही मिरची घेऊन गेले. मात्र या घटनेमुळे शेतकऱ्याची केविलवाणी अवस्‍था समोर आली अाहे.