डेटिंग अ‍ॅपवरून तिने त्याला पुण्यात बोलावले अन्…

पुणे (लाइव्ह ग्रुप वृत्तसेवा) ः डेटिंग अॅपवर ओळख झाल्यानंतर महिलेने त्याला मैत्रीच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर पुण्याला बोलावले. वाकड येथील एका हॉटेलात खोली बुक केल्यानंतर तिथे त्याच्या शीतपेयात गुंगीचे औषध टाकून ते प्यायला दिले. बेशुद्ध झाल्यानंतर तिने त्याच्याकडील सोन्याचे दागिने आणि रोकड असा दीड लाख रुपयांचा ऐवज लुटून पोबारा केला. पुण्यात घडलेल्या या घटनेतील महिला पोलिसांनी …
 

पुणे (लाइव्ह ग्रुप वृत्तसेवा) ः डेटिंग अ‍ॅपवर ओळख झाल्यानंतर महिलेने त्याला मैत्रीच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर पुण्याला बोलावले. वाकड येथील एका हॉटेलात खोली बुक केल्यानंतर तिथे त्याच्या शीतपेयात गुंगीचे औषध टाकून ते प्यायला दिले. बेशुद्ध झाल्यानंतर तिने त्याच्याकडील सोन्याचे दागिने आणि रोकड असा दीड लाख रुपयांचा ऐवज लुटून पोबारा केला. पुण्यात घडलेल्या या घटनेतील महिला पोलिसांनी शिताफीने पकडली असून, तिच्या सौंदर्याचे असे किती बळी ठरले, याचा शोध घेण्यात येत आहे.
चेन्नईतील आशिषकुमार या तरुणाने या प्रकरणी पोलिसांत तक्रार केली होती. एका डेटिंग अ‍ॅपवरून ओळख झाल्याचे त्याने पोलिसांना सांगितले होते. गुन्हे शाखेच्या युनिट 4 ने या महिलेला ताब्यात घेतले आहे. ही महिला हॉटेलच्या परिसरात येत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले होते. त्यानंतर पोलिसांनी या महिलेच्या मोबाइल लोकेशनवरून तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. तिने शीतपेयात गुंगीचे औषध मिसळले आणि तरुणाला प्यायला दिले. तरूण बेशुद्ध झाल्यानंतर त्याच्याकडील दागिने, मोबाइल आणि रोकड असा ऐवज घेऊन ती पसार झाली.