डिझेल, पेट्रोलचा नैवेद्य घेऊन मंदिरात गेले, मोदींची मूर्तीच गायब!; पुण्यातील प्रकार

पुणे (लाइव्ह वृत्तसेवा) ः पंतप्रधान नरेंद्र मोदींचे पुण्यात मंदिर उभारले गेल्याचे कळताच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते पेट्रोल, डिझेल नैवेद्य घेऊन साकडे घालण्यासाठी आले. मात्र मंदिरातील मोदींची मूर्तीच रातोरात गायब केल्याचे आज, १९ ऑगस्टला सकाळी समोर आलंय. मयूर मुंडे व त्याच्या सहकाऱ्यांनी हे मंदिर औंधमधील परिहार चौकात दीड ते दोन लाख रुपये खर्चून उभारलेय हे विशेष. …
 

पुणे (लाइव्ह वृत्तसेवा) ः पंतप्रधान नरेंद्र मोदींचे पुण्यात मंदिर उभारले गेल्याचे कळताच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते पेट्रोल, डिझेल नैवेद्य घेऊन साकडे घालण्यासाठी आले. मात्र मंदिरातील मोदींची मूर्तीच रातोरात गायब केल्याचे आज, १९ ऑगस्‍टला सकाळी समोर आलंय. मयूर मुंडे व त्‍याच्‍या सहकाऱ्यांनी हे मंदिर औंधमधील परिहार चौकात दीड ते दोन लाख रुपये खर्चून उभारलेय हे विशेष. या मंदिराशी मात्र भाजपाचा कोणताही संबंध नसल्याचे शहराध्यक्ष योगेश मुळीक यांनी स्‍पष्ट केले होते. मोदी यांना साकडे घालण्यासाठी थेट मंदिरच उपलब्‍ध झाल्याने राष्ट्रवादीच्‍या कार्यकर्त्यांना आयतीच संधी लाभली. ते सकाळी गेले मात्र मूर्ती गायब असल्याने त्‍यांनी आम्‍ही येण्यापूर्वीच मोदीजी झोला उचलून निघून गेले, अशी खोचक टीका केली. मूर्ती कुणी हलवली, रात्रीतून नक्‍की काय झालं, याबद्दल आता चर्चा होत आहे.