झोटींग समितीचा ‘या’ नेत्यावर ठपका

मुंबई ः माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना न्या. दिनकर झोटिंग समितीने ‘क्लीन चिट’ दिल्याचे सांगितले जात होते; परंतु या समितीने खडसे यांना ‘क्लीन चिट’दिलेली नाही, तर वास्तवात त्यांच्यावर ठपका ठेवला आहे, असं ताजं वृत्त आहे.पुण्यातील भोसरी एमआयडीसीतील जमीन घोटाळा प्रकरणाची चाैकशी करण्यासाठी भाजप-शिवसेना सरकारच्या काळात न्या. झोटिंग समितीची स्थापना करण्यात आली होती. देवेंद्र फडणवीस यांनीच …
 

मुंबई ः माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना न्या. दिनकर झोटिंग समितीने ‘क्लीन चिट’ दिल्याचे सांगितले जात होते; परंतु या समितीने खडसे यांना ‘क्लीन चिट’दिलेली नाही, तर वास्तवात त्यांच्यावर ठपका ठेवला आहे, असं ताजं वृत्त आहे.
पुण्यातील भोसरी एमआयडीसीतील जमीन घोटाळा प्रकरणाची चाैकशी करण्यासाठी भाजप-शिवसेना सरकारच्या काळात न्या. झोटिंग समितीची स्थापना करण्यात आली होती. देवेंद्र फडणवीस यांनीच ही समिती जाहीर केल्यानंतर खडसे यांना राजीनामा द्यावा लागला. झोटिंग समितीने अहवाल दिल्यानंतर युतीचे सरकार होते. त्या काळात अडीच वर्षे वारंवार मागणी करूनही हा अहवाल पटलावर ठेवला नाही. त्यामुळे त्याबाबत संशय व्यक्त केला गेला. या अहवालात खडसे यांना ‘क्लीन चिट’ असल्याचे सांगितले जात होते. या अहवालाचा वापर करून त्यांच्यामागचे चाैकशीचे शुक्लकाष्ट संपविण्याचा आघाडी सरकारचा हेतू होता; परंतु खडसे यांनी पदाचा दुरुपयोग केल्याचा ठपका त्यात ठेवल्याने खडसे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. तसेच विधान परिषदेवर नियुक्ती करून त्यांचे राजकीय पुनर्वसन करण्याचा मार्गही खडतर झाला आहे. झोटिंग समितीने खडसे यांच्यावर गंभीर ठपका ठेवला आहे. पत्नी मंदाकिनी आणि गिरीष चौधरी यांना जमीन विकत घेता यावी, यासाठी त्यांनी दाचा गैरवापर केल्याचा अहवाल झोटिंग समितीने तत्कालीन सरकारसमोर सादर केला होता, असे वृत्त आहे.