चुलत दिराचा वहिनीवर वाईट डोळा; शरीरसुखाची मागणी केली, नकार देताच धाडले यमसदनी!

पुणे : चुलत दिराच्या मित्राने लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर दिरानेही शरीरसुखाची मागणी केली. मात्र तिने नकार देताच त्याने गळा आवळला. ती जागीच गतप्राण झाली. ही धक्कादायक घटना पुणे -मुंबई महामार्गावरील घोरावडेश्वर डोंगरावर समोर आली. १९ वर्षीय विवाहितेचा पती मजूर आहे. गेल्या वर्षी तिचे लग्न झाले होते. रविवारी सकाळी दहाला तिला २६ वर्षीय चुलत दिर (रा. …
 

पुणे : चुलत दिराच्‍या मित्राने लैंगिक अत्‍याचार केला. त्‍यानंतर दिरानेही शरीरसुखाची मागणी केली. मात्र तिने नकार देताच त्‍याने गळा आवळला. ती जागीच गतप्राण झाली. ही धक्‍कादायक घटना पुणे -मुंबई महामार्गावरील घोरावडेश्वर डोंगरावर समोर आली.

१९ वर्षीय विवाहितेचा पती मजूर आहे. गेल्या वर्षी तिचे लग्‍न झाले होते. रविवारी सकाळी दहाला तिला २६ वर्षीय चुलत दिर (रा. देहू रोड) आणि त्‍याच्‍या मित्राने दर्शनासाठी घोरावडेश्वर डोंगरावर नेले होते. याच ठिकाणी झाडीत नेऊन तिच्‍यावर दिराच्या मित्राने लैंगिक अत्‍याचार केला. त्‍यानंतर दिरानेही तिच्‍याकडे शरीरसुखाची मागणी केली.

मात्र नात्‍यामुळे तिने नकार दिला. त्‍यामुळे तो संतापला. त्‍याने ओढणीने गळा आवळला. तिचा मृत्‍यू झाल्याचे लक्षात येताच त्‍याने तिचा चेहरा दगडाने ठेचला आणि झुडूपांत फेकून दिला. मृतदेह समोर आल्यानंतर तिच्‍या पतीने या प्रकरणात तक्रार दिली. पोलिसांनी या घटनेचा अल्पावधीत तपास केला. त्‍यात चुलत दिरावर संशय निर्माण झाला. त्‍याला ताब्‍यात घेऊन पोलिसांनी चौकशी केली असता त्‍याने खुनाची कबुली दिली. त्‍याचा साथीदार अक्षय कारंडे फरारी आहे.