एका गुन्ह्यातून मुक्त, तरी छोटा राजन राहणार तुरुंगात!

मुंबई : कुख्यात गुंड छोटा राजन याची गोळीबार प्रकरणातून सुटका करण्यात आली असली, तरी त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल असल्याने त्याचा तुरुंगातील मुक्काम कायम राहणार आहे. युसुफ लकडावाला हा बिल्डर व चित्रपटांच्या निर्मितीसाठी पैसे पुरवत होता. त्याच्यावर ठोता राजनने गोळीबार केला होता. सीबीआयने त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करून तपास केला; परंतु त्यातून काहीच निष्पन्न झाल्यानं सीबीआयनं क्लोजर …
 

मुंबई : कुख्यात गुंड छोटा राजन याची गोळीबार प्रकरणातून सुटका करण्यात आली असली, तरी त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल असल्याने त्याचा तुरुंगातील मुक्काम कायम राहणार आहे.

युसुफ लकडावाला हा बिल्डर व चित्रपटांच्या निर्मितीसाठी पैसे पुरवत होता. त्याच्यावर ठोता राजनने गोळीबार केला होता. सीबीआयने त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करून तपास केला; परंतु त्यातून काहीच निष्पन्न झाल्यानं सीबीआयनं क्लोजर रिपोर्ट विशेष सीबीआय न्यायालयानं नुकताच स्वीकारला. त्यामुळं राजन या खटल्यातून मुक्त झाला. छोटा राजनविरोधात पुरेसे पुरावे न सापडल्यानं दोन दशकांपूर्वीच्या गोळीबार प्रकरणात सीबीआयनं तीन महिन्यांपूर्वी ‘क्लोजर रिपोर्ट’ दाखल केला होता. सध्या युसुफ हा ही आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी ‘ईडी’च्या न्यायालयीन कोठडीत आहे. युसुफला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे क्लोजर रिपोर्टप्रकरणी विचारणा करण्यात आली, तेव्हा त्यानेही आपली हरकत नसल्याचे न्यायालयाला सांगितले. त्यामुळे विशेष न्यायाधीश ए. टी. वानखेडे यांनी सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट स्वीकारला. छोटया राजनला फौजदारी दंड संहितेच्या कलम १६९ अन्वये सोडण्याचा आदेश दिला.