उद्धव ठाकरेंची विदेशात बेकायदा संपत्ती!; आ. राणा यांच्‍या आरोपाने खळबळ

अमरावती (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विदेशात मोठी बेकायदा संपत्ती असून, त्याविरोधात ईडी व सीबीआयकडे तक्रार करणार असल्याचा इशारा आमदार रवी राणा यांनी दिला आहे. खासदार नवनीत राणा यांचे जातप्रमाणपत्र रद्द करण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यानंतर आता राणा दाम्पत्य शिवसेनेविरोधात आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. नवनीत यांचे …
 

अमरावती (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विदेशात मोठी बेकायदा संपत्ती असून, त्याविरोधात ईडी व सीबीआयकडे तक्रार करणार असल्याचा इशारा आमदार रवी राणा यांनी दिला आहे. खासदार नवनीत राणा यांचे जातप्रमाणपत्र रद्द करण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्‍यानंतर आता राणा दाम्पत्य शिवसेनेविरोधात आक्रमक झाल्‍याचे दिसून येत आहे. नवनीत यांचे पती रवी राणा यांनी तर थेट मुख्यमंत्र्यांनाच शिंगावर घेतले आहे.

मुख्यमंत्री ठाकरे हे अॅड. अनिल परब यांच्या माध्यमातून नवनीत राणा यांना टार्गेट करत असून, द्वेषाचे राजकारण करत आहेत. ठाकरे यांच्या विदेशातील बेकायदा संपत्तीची, जमिनींची व घरांची माहिती मी स्‍वतः घेतली आहे. ती सर्व माहिती ईडी, सीबीआयला देणार असून, तातडीने कारवाईची मागणी करणार असल्याचे आ. राणा यांनी म्हटले आहे.

माजी खासदार आनंदराव अडसूळ सातत्‍याने नवनीत राणा यांच्या विरोधात तक्रारी करतात. अनुसूचित जाती-जमाती आयोगाकडे केलेल्या तक्रारीत नवनीत राणा जिंकल्या. जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे नवनीत जिंकल्या. यानंतरही उच्‍च न्‍यायालयाने दिलेला जातप्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय आमच्यासाठी धक्कादायक होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे, असे राणा म्हणाले. स्वातंत्र्यापूर्वीपासूनची २०० हून अधिक कागदपत्रे आता आम्‍ही न्यायालयात सादर करू, असेही ते म्‍हणाले.