इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याचा धक्कादायक कारनामा… ‘तो’ व्हिडिओ टाकला इन्स्टाग्रामवर!
सोलापूर (सोलापूर लाइव्ह वृत्तसेवा) ः इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला शिकणाऱ्या विद्यार्थ्याने मोबाइलद्वारे चाइल्ड पोर्नोग्राफीचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर अपलोड केल्याची घटना सोलापूरमध्ये समोर आली असून, या विद्यार्थ्याला सायबर सेलच्या पथकाने अटक केली आहे. मनीष विजयराज बंकापुरे (23, रा. पूर्व मंगळवार पेठ, कोंतम चौक) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तांत्रिक कौशल्य वापरत विविध सॉफ्टवेअरद्वारे माहितीचे विश्लेषण करून …
Jun 8, 2021, 14:04 IST
सोलापूर (सोलापूर लाइव्ह वृत्तसेवा) ः इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला शिकणाऱ्या विद्यार्थ्याने मोबाइलद्वारे चाइल्ड पोर्नोग्राफीचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर अपलोड केल्याची घटना सोलापूरमध्ये समोर आली असून, या विद्यार्थ्याला सायबर सेलच्या पथकाने अटक केली आहे. मनीष विजयराज बंकापुरे (23, रा. पूर्व मंगळवार पेठ, कोंतम चौक) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तांत्रिक कौशल्य वापरत विविध सॉफ्टवेअरद्वारे माहितीचे विश्लेषण करून बंकापुरेला अटक केली. त्याच्याविरुध्द पोलिस नाईक बाबूराव मंगरुळे यांनी सरकारतर्फे माहिती व तंत्रज्ञान कायदा २००० चे कलम ६७ (ए) प्रमाणे तक्रार नोंदवली आहे.